यूट्यूबचा हा नियम १५ ऑक्टोबरपासून बदलला, आता करता येणार मोठी कमाई
Youtube New Rule : YouTube ने नवीन फीचर जाहीर केले आहे. 15 ऑक्टोबर 2024 पासून किएटर्सना शॉर्ट्स म्हणून तीन मिनिटांपर्यंतचे उभ्या किंवा आडवा व्हिडिओ अपलोड करण्याची परवानगी दिली जाणार आहे. शॉर्ट्स रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेल यासाठी लागू केले जाईल. काय आहे हा नियम जाणून घ्या.
YouTube च्या माध्यमातून आज अनेक लोकांना आपले विचार, आपल्या आवडी निवडी, जगासमोर ठेवण्याचं व्यासपीठ मिळालं आहे. त्यामुळे आज करोडो लोकं युट्युबवर व्हिडिओ अपलोड करत असतात. यामध्ये भारतीयांची संख्या मोठी आहे. कंपनी लोकांची हित आणि गरजा लक्षात घेऊन वेगवेगळे बदल करत असते. असाच एक मोठा बदल कंपनीने केला आहे. कंपनीने Shorts व्हिडिओसाठी एक मोठा बदल केला आहे. आता 15 ऑक्टोबर 2024 पासून क्रिएटर्सना तीन मिनिटांपर्यंतचे व्हिडिओ अपलोड करण्याची परवानगी दिली जाणार आहे. ज्यामुळे शॉर्ट व्हिडिओ तयार करणाऱ्या लोकांना फायदा होणार आहे.
15 ऑक्टोबर 2024 नंतर, कोणत्याही व्हिडिओ जो तीन मिनिटांपर्यंत असेल तो आपोआप शॉर्ट्स म्हणून वर्गीकृत केला जाणार आहे. हा व्हिडिओ प्लॅटफॉर्मच्या Shorts च्या कमाई-शेअरिंग मॉडेलसाठी पात्र असेल. ज्यामुळे क्रिएटर्सना Shorts फीडद्वारे चांगली कमाई करता येईल. १५ तारखेपूर्वी अपलोड केलेला तीन मिनिटापर्यंतचा व्हिडिओ लाँग-फॉर्म व्हिडिओ म्हणूनच वर्गीकृत केले जातील. YouTube च्या पारंपारिक कमाई मॉडेल अंतर्गतच त्यामधून कमाई होईल.
युट्युबच्या या नवीन अपडेटमुळे अनेकांना फायदा होणार आहे, कमी वेळात जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोहोचवता येणार आहे. सध्या YouTube मोबाइल ॲपच्या शॉर्ट्स कॅमेराद्वारे तीन-मिनिटांचे शॉर्ट्स चित्रित करू शकणार नाहीत. त्याऐवजी, ते डेस्कटॉप आणि मोबाइल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या YouTube स्टुडिओद्वारे या क्लिप अपलोड करू शकतील.
विशेष म्हणजे, YouTube ने एका मिनिटापेक्षा जास्त मोठ्या व्हिडिओंबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ज्यामध्ये थर्ड पार्टीचा असलेला कंटेंट. YouTube च्या Content ID प्रणालीद्वारे ओळखल्या जाणाऱ्या कॉपीराइट केलेली सामग्री असलेले शॉर्ट्स जागतिक स्तरावर ब्लॉक केले जातील. प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ पाहण्यापासून किंवा शिफारस करण्यापासून प्रतिबंधित केले जातील. अशा व्हिडिओंना कमाईसाठी अपात्र देखील केले जाईल.
कमाई करणे सोपे होणार
YouTube वर आता कमाई करणे आणखी सोपे होणार आहे. जर तुम्हालाही यातून पैसे कमवायचे असेल तर हे फीचर तुम्हाला खूप मदत करणार आहे. कारण लहान व्हिडिओंना जास्त व्ह्यूज मिळतात जे खूप फायदेशीर ठरते. अशा परिस्थितीत तुम्ही हा पर्याय तुमच्या यादीत समाविष्ट करू शकता.