YouTube वरील डिसलाईक्स आता दिसणार नाहीत, कंपनी नवे बदल करणार

YouTube ने गुरुवारी जाहीर केले की 'काउंट टू डिसलाइक' बटण यापुढे दर्शकांना दिसणार नाही. तथापि, क्रिएटर्स YouTube स्टुडिओमध्ये डिसलाइक्सची संख्या पाहू शकतात.

YouTube वरील डिसलाईक्स आता दिसणार नाहीत, कंपनी नवे बदल करणार
YouTube-
Follow us
| Updated on: Nov 13, 2021 | 5:59 PM

मुंबई : YouTube ने गुरुवारी जाहीर केले की ‘काउंट टू डिसलाइक’ बटण यापुढे दर्शकांना दिसणार नाही. तथापि, क्रिएटर्स YouTube स्टुडिओमध्ये डिसलाइक्सची संख्या पाहू शकतात. त्यांचा कंटेंट कसा आहे, लोकांना आवडतोय का, कंटेंट कसा परफॉर्म करतोय हे क्रिएटर्सना पाहता येईल. “आम्ही YouTube वर डिसलाईक्सची संख्या खासगी करत आहोत, परंतु डिसलाइक बटण हटवणार नाही,” असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. हा बदल आजपासून हळूहळू सुरू होईल. (YouTube gives dislikes thumbs-down, hides public counts)

प्रेक्षक अद्याप व्हिडिओ डिसलाइक करू शकतात, त्यांच्या शिफारसी ट्यून करू शकतात आणि क्रिएटर्ससह खाजगीरित्या अभिप्राय शेअर करू शकतात. YouTube ने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर अगदी नवीन न्यू टू यू टॅब आणण्यास सुरुवात केली आहे जेणेकरून युजर्स होम फीडवर दिसणार्‍या सामान्य रिकमेंडेशनचा भाग नसलेला कंटेंट काढू शकतील, शोधू शकतील.

नवीन टॅब मोबाइल, डेस्कटॉप आणि टीव्ही डिव्हाईसवर YouTube होमपेजवर उपलब्ध आहे. न्यू टू यू बद्दल अधिक तपशील शेअर करण्यास आम्ही उत्सुक आहोत, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. हे एक असे फीचर आहे जे तुम्हाला नवीन क्रिएटर्स आणि नवीन कंटेंट शोधण्यात मदत करते जे तुम्ही साधारणपणे पाहता त्यापेक्षा जास्त रिकमेंडेड व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. न्यू टू यू हे फीचर आता मोबाइल, डेस्कटॉपवर YouTube होमपेजवर उपलब्ध आहे.

हे फीचर त्यांच्या कंटेंटमध्ये सर्वाधिक स्वारस्य असलेल्या युजर्सना लक्ष्य करून नवीन प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत करेल अशी अपेक्षा आहे.

लाइव-स्ट्रीमिंग करताना इंग्रजीशिवाय इतर भाषांचा पर्याय

गूगलच्या मालकीचे असणाऱ्या यूट्यूबने आता एक नविन फिचर लॉन्च करणार आहे. यामध्ये व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये बदल करण्यात येणार आहेत. येत्या काही महीन्यात हा बदल होईल अशी माहीती समोर येत आहे. यूट्यूबर्सना आता लाइव-स्ट्रीमिंग करताना इंग्रजी भाषेशिवाय इतर भाषा उपलब्ध होणार आहेत. याशिवाय ऑटो कॅप्शनचा पर्याय उपलब्ध होणार आहे. या सुविधेचा लाइव-स्ट्रीमिंगला समावेशक आणि एक्सेसिबल करण्यासाठी फायदा होईल.

YouTube आता अँड्रॉइड आणि आईओएसवर एक नविन फिचर लॅन्च करणार आहे. या फिचरमध्ये कॅप्शनमध्ये ऑटो ट्रांसलेशन सुरू करण्यात येणार आहे. साध्या ही सेवा फक्त डेक्सटॉपवर उपलब्ध आहे. परंतू यूट्यूबने केलेल्या या बदलामुळे आता यूजर्स त्यांच्या मोबईलवरून सुद्धा कॅप्शन देऊ शकतात.

इतर बातम्या

48MP कॅमेरा आणि दमदार फीचर्स, नोकियाचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच, किंमत…

50MP कॅमेरा आणि आकर्षक डिझाईनसह Poco M4 Pro 5G स्मार्टफोन बाजारात, जाणून नव्या स्मार्टफोनमध्ये काय आहे खास

64MP क्वाड कॅमेरा, मीडियाटेक प्रोसेसर, स्टाँग बॅटरीसह Lava चा पहिला 5G फोन बाजारात, कंपनीकडून 2000 रुपयांचा डिस्काऊंट

(YouTube gives dislikes thumbs-down, hides public counts)

वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....