YouTube ॲपमध्येच मिळणार प्रो लेव्हल एडिटिंग; आता वेगळं अॅप डाऊनलोड करण्याची गरज नाही
तुम्ही पण YouTube Shorts चे क्रिएटर आहात का? भारी व्हिडीओ बनवण्यासाठी तुम्हालाही वेगळ्या एडिटिंग ॲपची मदत घ्यावी लागते? तर मग तुमच्यासाठी एक जबरदस्त खुशखबर आहे!

तुम्हीही YouTube Shorts बनवत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची माहिती. आतापर्यंत व्हिडीओ एडिटिंगसाठी अनेक क्रिएटर्सना बाहेरच्या अॅप्स वापरावे लागायचे. कारण YouTube ॲपमध्ये आवश्यक फीचर्स नव्हते आणि व्हिडीओला चांगले इफेक्ट्स, नीट कटिंग, लेयरिंगसाठी देण्यासाठी वेळ आणि मेहनत लागायची. म्हणूनच आता YouTube ने क्रिएटर्सचा फीडबॅक ऐकून Shorts “एडिटरमध्ये प्रो लेव्हल” नावाचा टूल्स देण्याची तयारी केली आहे.
“एडिटरमध्ये प्रो लेव्हल” मध्ये काय नवीन मिळेल
YouTube आपल्या Shorts किंवा Video एडिटरमध्ये काही जबरदस्त नवीन टूल्स आणण्याच्या तयारीत आहे. विचार करा, इन्स्टाग्राम रील्सवर मिळतात तसले अनेक भारी फीचर्स आता तुम्हाला थेट YouTube ॲपमध्येच वापरायला मिळतील. यामुळे तुमचा वेळ तर वाचेलच, पण तुमचे व्हिडीओ पण अधिक आकर्षक आणि प्रोफेशनल दिसतील. चला बघूया काय काय नवीन असणार आहे:
1. आता तुम्ही व्हिडीओच्या प्रत्येक क्लिपची लांबी-रुंदी, म्हणजे अगदी सेकंदाच्या हिशोबाने अचूकपणे ॲडजस्ट करू शकाल. क्लिपला झूम करणं, तिला हवं तसं पुढे-मागे सरकवणं, नको असलेला भाग काढणं, बॅकग्राउंडला तुमच्या आवडीचं संगीत लावणं, योग्य वेळी स्क्रीनवर टेक्स्ट आणणं… हे सगळं आता YouTube ॲपमध्येच करणं शक्य होणार आहे. YouTube च्या म्हणण्यानुसार, हे तर फक्त ट्रेलर आहे, भविष्यात एडिटिंग अजून सोपी होईल!
2. तुमच्या गॅलरीतल्या फोटोंमधून झटपट व्हिडीओ बनवण्यासाठी तयार टेम्प्लेट्स मिळतील. विशेष म्हणजे, या टेम्प्लेट्समध्ये तुम्ही इफेक्ट्स पण टाकू शकाल आणि ज्याने ते मूळ टेम्प्लेट बनवलंय, त्याला आपोआप क्रेडिटही मिळेल. एवढंच नाही, तर तुम्ही स्वतःचे खास ‘इमेज स्टिकर्स’ तयार करून तुमच्या व्हिडीओला एक वेगळा आणि पर्सनल टच देऊ शकाल. आणि अजून एक भारी गोष्ट म्हणजे आता फक्त कमांड द्यायची आणि AI तुमच्यासाठी तसा स्टिकर तयार करून देईल! म्हणजे प्रत्येक व्हिडीओला एक युनिक लुक देता येईल.
3.सगळ्यात कंटाळवाणं काम म्हणजे व्हिडीओ क्लिप्सना गाण्याच्या बीटनुसार मॅच करणं. पण आता चिंता नाही! YouTube एक नवीन ऑटोमॅटिक फीचर आणत आहे, जे तुमच्या व्हिडीओ क्लिप्सना तुम्ही निवडलेल्या गाण्याच्या तालावर अगदी परफेक्ट सिंक करून देईल. फक्त गाणं निवडा आणि बाकीचं काम YouTube करेल. यामुळे तुमचा खूप वेळ वाचेल आणि व्हिडीओ बघायलाही जास्त मजा येईल.
कधी पासून सूरु होणार “एडिटरमध्ये प्रो लेव्हल”
YouTube ने सांगितलं आहे की हे सर्व नवीन आणि आकर्षक फीचर्स या वर्षाच्या जून किंवा जुलाई महिन्यापर्यंत हळूहळू सर्व क्रिएटर्ससाठी उपलब्ध केले जातील. त्यामुळे थोडी वाट बघावी लागेल, पण सबर का फल नक्कीच मिठा असेल.