‘औरंगाबादचं संंभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशीव करा’

पंकज भनारकर, टीव्ही 9 मराठी, मुंबई: उत्तर प्रदेशात नामांतराची मालिका सुरु असताना, महाराष्ट्रातही मागणी जोर धरु लागली आहे. औरंगाबादचं नाव संभाजीनगर, तर उस्मानाबादचं नाव धाराशीव करण्याची मागणी शिवसेनेने लावून धरली आहे. शिवसेना नेत्यांनी वेळोवेळी ही भूमिका मांडली आहेच, शिवाय आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन मुख्यमंत्र्यांना तसा सवाल केला आहे. संजय राऊत यांनी […]

'औरंगाबादचं संंभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशीव करा'
Follow us
| Updated on: Nov 07, 2018 | 5:40 PM

पंकज भनारकर, टीव्ही 9 मराठी, मुंबई: उत्तर प्रदेशात नामांतराची मालिका सुरु असताना, महाराष्ट्रातही मागणी जोर धरु लागली आहे. औरंगाबादचं नाव संभाजीनगर, तर उस्मानाबादचं नाव धाराशीव करण्याची मागणी शिवसेनेने लावून धरली आहे. शिवसेना नेत्यांनी वेळोवेळी ही भूमिका मांडली आहेच, शिवाय आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन मुख्यमंत्र्यांना तसा सवाल केला आहे. संजय राऊत यांनी “योगी आदित्यनाथ यांनी फैजाबादचे अयोध्या केले, अलाहाबादचे प्रयाग तिर्थ केले, मुख्यमंत्री देवेंद्रजी औरंगाबादचे संभाजी नगर आणि उस्मानाबादचे धाराशीव कधी करणार? जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम!” असं ट्विट केलं आहे.

विचारधारेचा प्रभाव सरकारच्या कामात पडतोच. पण सरकारला कधी कधी जनभावनेचाही विचार करावा लागतो. किंवा मग आपला अजेंडा राबवणं तर त्यांचं काम असतंच. असंच काहीसं सध्या देशात सुरु असल्याचं दिसतंय. कारण शहरांचं नामकरण जोरात सुरु आहे. उत्तर प्रदेशानंतर गुजरात आणि गुजरातनंतर महाराष्ट्रात ही मालिका सुरु होण्याची चिन्हं आहेत.

शहरांची नावं बदलण्याचा सपाटा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नावं बदलण्याचा सपाटा सुरु केला आहे. अलाहाबादचं नाव प्रयागराज केलं त्यानंतर आता फैजाबादचं जिल्ह्याचं नाव अयोध्या केलं. उत्तर प्रदेशानंतर आता गुजरातमध्येही अहमदाबादचं नाव कर्णावती करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री नितीन पटेलांनी केली आहे. आता महाराष्ट्रातही औरंगाबादचं नाव संभाजीनगर, तर उस्मानाबादचं नाव धाराशीव करण्याची मागणी शिवसेनेने लावून धरली आहे.

खरं तर याआधीही 1995 मध्ये युती सरकारच्यावेळी बॉम्बेचं नाव मुंबई झालं. पुढे कलकत्ता कोलकाता, मद्रासचं  चेन्नई झालं. सरकार बदललं की विचारधारेप्रमाणं शहरांची नावंही बदलतात. औरंगाबादचं बोलायचं झालं तर शिवसेना आणि भाजपकडून याआधीही संभाजीनगर नाव ठेवण्याची मागणी झाली आहे. पण 4 वर्ष उलटली.

असं असलं तरी प्रश्न सध्या एकच उरतोय की नावं बदलून शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे का?

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.