मराठा आरक्षणाचा निर्णय घेऊनच बैठकीतून उठणार
योगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, पुणे : मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत काऊंटडाऊन सुरु झालं आहे. राज्य मागासवर्ग आयोगाची अखेरची बैठक पुण्यात सुरु झाली आहे. काहीही झालं, कितीही उशीर झाला तरी आज या बैठकीत निर्णय घ्यावाच लागणार आहे. कारण मराठा आरक्षणाबाबतचा मागासवर्ग आयोगाचा अहवाल 15 नोव्हेंबरपर्यंत सादर करु, असं राज्य सरकारने हायकोर्टात सांगितलं आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा […]
योगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, पुणे : मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत काऊंटडाऊन सुरु झालं आहे. राज्य मागासवर्ग आयोगाची अखेरची बैठक पुण्यात सुरु झाली आहे. काहीही झालं, कितीही उशीर झाला तरी आज या बैठकीत निर्णय घ्यावाच लागणार आहे. कारण मराठा आरक्षणाबाबतचा मागासवर्ग आयोगाचा अहवाल 15 नोव्हेंबरपर्यंत सादर करु, असं राज्य सरकारने हायकोर्टात सांगितलं आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला आरक्षण देता येईल की नाही यासाठीची राज्य मागासवर्ग आयोगाची अखेरची बैठक पुण्यात सुरू झाली आहे. आज कितीही उशीर झाला तरी आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी आयोगाकडून गठीत करण्यात आलेली समिती आपलं काम पूर्ण करणार आहे. बुधवारी संध्याकाळी किंवा गुरुवारी राज्य मागासवर्ग आयोग त्यांनी तयार केलेला अहवाल राज्य सरकारला सादर करणार आहे. त्यानंतर सरकार तो न्यायालयात सादर केला जाईल.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीची पडताळणी करण्यासाठी आयोगानं राज्यातील पाच वेगवेगळ्या विभागांमधील पाच संस्थांकडून सर्वेक्षण करून घेतले होते. जुलै महिन्याच्या अखेरीस सर्वेक्षणाचे रिपोर्ट आयोगाला सादर करण्यात येणार आले. आजच्या अखेरच्या बैठकीला आयोगाचे सदस्य आणि अध्यक्षांबरोबरच समाजशास्त्रज्ञही उपस्थित आहेत.
राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती एम जी गायकवाड, ओबीसी आयोगाचे मेंबर सेक्रेटरी डी .डी. देशमुख, आयोगाचे सदस्य यांच्यामध्ये ही बैठक सुरू आहे.
मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्याची शिफारस
मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्यात यावं, अशी मागासवर्ग आयोगाने शिफारस केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात अभ्यास करणारा अहवाल मागासवर्ग आयोगाने तयार केला आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल 15 तारखेपूर्वी राज्य सरकारला सादर होण्याची शक्यता आहे.