शिवरायांबद्दल आक्षेपार्ह बरळणारा छिंदम निवडणुकीच्या मैदानात
कुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर : शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा अहमदनगर महापालिकेचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम पुन्हा एकदा निवडणूक लढणार आहे. श्रीपाद छिंदमने उमेदवारी अर्ज घेतला आहे. पण तो कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढणार की अपक्ष लढणार याबाबत अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही. श्रीपाद छिंदम याने प्रभाग 9 आणि 13 साठी उमेदवारी अर्ज विकत घेतला […]
कुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर : शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा अहमदनगर महापालिकेचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम पुन्हा एकदा निवडणूक लढणार आहे. श्रीपाद छिंदमने उमेदवारी अर्ज घेतला आहे. पण तो कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढणार की अपक्ष लढणार याबाबत अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही.
श्रीपाद छिंदम याने प्रभाग 9 आणि 13 साठी उमेदवारी अर्ज विकत घेतला आहे. शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर श्रीपाद छिंदमला भाजपने पक्षातूनही निलंबित केलं होतं. शिवाय तो शिवप्रेमींच्या निशाण्यावर आला होता. या वक्तव्यानंतर त्याला तुरुंगवासही भोगावा लागला.
शिवजयंतीच्या तोंडावर महापालिकेतील बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्याशी कामासंदर्भात फोनवरुन बोलताना, छिंदमने शिवराय आणि शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर नगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. सर्वच स्तरातून छिंदमबद्दल संताप व्यक्त केला गेला.
राज्यात 9 डिसेंबर रोजी नगर आणि धुळे महापालिकेसाठी मतदान होणार आहे. तर 10 डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे. अहमदनगरमध्ये 17 प्रभागातील 68 जागांसाठी ही निवडणूक होत असून 13 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.