महा शिवरात्री
महाशिवरात्री हा सण संपूर्ण देशात साजरा केला जातो. भगवान शंकर आणि पार्वती यांच्या विवाहाचा उत्सव म्हणून महाशिवरात्र साजरी केली जाते. या दिवशी भाविक शंकराच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतात. शिव आणि शक्तीच्या मिलनाचा दिवस म्हणूनही या उत्वसाकडे पाहिलं जातं. समुद्र मंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी महादेवाने प्राशन करून जगाला भयंकर नाशापासून वाचवले होते. त्याचं ऋण फेडण्याचा दिवस म्हणूनही महाशिवरात्र साजरी केली जाते. या दिवशी सर्व शिवमंदिरात भोलेनाथाचा रुद्राभिषेक केला जातो.