नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदी भारताचे (Prime Minister of India) विद्यमान पंतप्रधान आहेत. मे 2024 पासून मोदी देशाचे पंतप्रधान म्हणून काम पाहत आहेत. यापूर्वी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. 2001 ते 2014पर्यंत मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. मोदी उत्तर प्रदेशातील वाराणासी लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे भाजपचे मोठे नेते आहेत. ते संघाचेही स्वयंसेवक होते. 17 सप्टेंबर 1950 मध्ये मोदींचा गुजरातच्या वडनगरमध्ये जन्म झाला होता. मोदी यांच्या नेतृत्वात 2014मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली गेली. या निवडणुकीत भाजपने मोठं यश मिळवलं. त्यामुळे मोदी पंतप्रधान झाले. मोदींच्या लाटेमुळेच 2014मध्ये भाजपला देशातील अनेक राज्यात विधानसभा निवडणुकीत विजय मिळाला. 2019ची लोकसभा निवडणूकही मोदींच्याच नेतृत्वात लढवण्यात आली. यावेळीही भाजपला घवघवीत यश मिळालं. मोदींनी त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. धाडसी निर्णयामुळे त्यांची लोकप्रियता अधिक वाढली. नोटाबंदी, जीएसटी लागू करणे, पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक, जम्मू-काश्मीरमधून 370 कलम हटवणे आणि तीन तलाकच्या कायद्याबाबतचे निर्णय त्यांनी घेतले.