नितीन गडकरी
नितीन गडकरी हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. केंद्रीय परिवहन मंत्री आहेत. गडकरी हे मूळचे नागपूरचे. त्यांचा जन्मही नागपूरचाच. एम कॉम, एलएलबीपर्यंत त्यांचं शिक्षण झालंय. गडकरी यांना तीन मुलं आहेत. विद्यार्थी दशेपासूनच गडकरी हे विद्यार्थी संघटनेशी जोडले गेले. 1995मध्ये शिवसेना-भाजपच्या युती सरकारमध्ये गडकरी यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदाची जबाबदारी आली होती. मंत्री असताना त्यांनी राज्यातील पूल बांधणीवर जोर दिला होता. त्यामुळे गडकरी अधिक चर्चेत आले. 1989मध्ये ते पहिल्यांदाच विधान परिषदेवर निवडून गेले होते. त्यापूर्वी 1983च्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं होतं. 20 वर्षाच्या विधानपरिषदेच्या काळात त्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही काम पाहिलं होतं.