Dog birthday : कुत्र्याच्या वाढदिवसाला खर्च केले 11 लाख, झगमगाट बघून डोळे फिरतील

मालकीनीचे या कुत्र्यावर इतके प्रेम आहे, की त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी या मालकीनीने तब्बल 11 लाख रुपये खर्च केले आहेत.

Dog birthday : कुत्र्याच्या वाढदिवसाला खर्च केले 11 लाख, झगमगाट बघून डोळे फिरतील
Follow us
| Updated on: Dec 26, 2021 | 12:54 PM

काही माणसांचे प्रण्यांवर खूप प्रेम असते, ते त्यांची खूप चांगली काळजी घेतात, त्यांना स्पेशल फील व्हावे यासाठी पैशांचा विचार करत नाही, पाण्यासारखा पैसा खर्च करतात. चीनमध्ये एका कुत्र्याच्या मालकीनीने आपल्या कुत्र्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लाखो रूपये खर्च केले आहेत. वाढदिवसाला केलेला झगमगाट पाहून तर अनेकांचे डोळे फिरले. कारण एवढा खर्च तर एखाद्याच्या लग्नातही होत नाही.

एवढा दिमाखदार वाढदिवस साजरा केलेल्याा कुत्र्याचे नाव डाऊ डाऊ आहे. तो चीनच्या हुनान भागातील आहे. या मालकीनीचे या कुत्र्यावर इतके प्रेम आहे, की त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी या मालकीनीने तब्बल 11 लाख रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे या कुत्र्याच्या वाढदिवसाची फक्त चीनमध्येच नाही तर जगभर चर्चा आहे.

वाढदिवसाला 520 ड्रोनचा वापर

या मालकिनीने कुत्र्याच्या वाढदिवसादिवशी ड्रोन शो केला होता. या ड्रोन शो मध्ये तब्बल 520 ड्रोनचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे. या ड्रोनच्या माध्यमातून आकाशात हॅपी बर्थडे डाऊ डाऊ लिहण्यात आले होते. जन्मदिवस साजरा करताना हा व्हिडिओ चायनीज अॅप टिकटॉकवर अपलोड केला होता. त्यानंतरच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कुत्र्याच्या वाढदिवसाला स्पेशल ड्रेस

कुत्र्याच्या मालकिनीने वाढदिवसादिवशी कुत्र्यासाठी स्पेशल ड्रेस तयार केला होता. असे ड्रोन मोठमोठ्या लग्नात दिसून येतात मात्र कुत्र्याच्या वाढदिवसाला अशी तयारी पाहून लोकही आश्चर्यचकीत झाले. कारण लोकांनी कुत्र्यांच्या वाढदिवसाला कदाचित पहिल्यांदाच इतके ड्रोन पाहिले असतील. कुत्र्यांच्या मालकीनीने किमान तीस मिनिटे हा ड्रोन शो चालला पाहिजे अशा सूचना ड्रोन कंपनीला दिल्या होत्या. यावेळी वाढदिवसाला हॅपी बर्थडे सॉन्गही कुत्र्याच्या आवाजात रेकॉर्ड केले होते. एवढा खर्चतर आपल्याकडे एखाद्याच्या लग्नातही होत नाही.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.