VIDEO : चिमुकलीचे अपहरणकर्त्याशी दोन हात, नराधमाला जमिनीवर पाडलं, घटना कॅमेऱ्यात कैद, व्हिडीओ व्हायरल
तो मुलीला उचलण्यासाठी प्रयत्न करतो. मात्र, मुलगी त्याच्या हातून निसटण्यात यशस्वी होते (11 year old girl fought with kidnapper video goes viral)
फ्लोरिडा (अमेरिका) : सोशल मीडियावर सध्या एका सत्य घटनेशी संबंधित व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओत एक नराधम 11 वर्षीय मुलीचं अपहरण करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, मुलगी त्याला तोडीस तोड प्रतिकार करते. तो मुलीला उचलण्यासाठी प्रयत्न करतो. मात्र, मुलगी त्याच्या हातून निसटण्यात यशस्वी होते. या धावपळीत मुलगी त्यालाही खाली पाडते. त्यानंतर ती तिथून पळून जाते. तर आरोपी देखील घाबरुन आपल्या कारमध्ये बसून निघून जातो. ही घटना कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झालीय. या व्हिडीओला कुणीतरी सोशल मीडियावर शेअर केलं. त्यानंतर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय (11 year old girl fought with kidnapper video goes viral).
व्हिडीओत नेमकं काय?
संबंधित व्हिडीओ हा अमेरिकेतील असल्याची माहिती समोर आली आहे. एक 11 वर्षीय चिमुकली अमेरिकेच्या फ्लोरिडा शहरातील एका बस स्थानकावर मंगळवारी (19 मे) बसची वाट बघत बसलेली होती. यावेळी तिथे एक SUV कार घेऊन एक व्यक्ती आला. त्याने मुलीजवळ गाडी थांबवली. त्यानंतर तो गाडीतून उतरुन मुलीजवळ गेला. त्याने मुलीला उचलण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुलगी त्याला प्रतिकार करते. मुलीच्या प्रतिकारामुळे दोघी जमिनीवर खाली कोसळतात. त्यानंतर मुलगी झटक्यात उठते आणि पळून जाते. तर अपहरणकर्ता देखील घाबरुन आपल्या गाडीत बसतो आणि घटनास्थळावरुन पळ काढतो.
आरोपीला बेड्या
या घटनेप्रकरणी मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार केली आहे. तसेच पोलिसांनी आरोपीला बेड्याही ठोकल्या आहेत. Jared Paul Stanga असं आरोपीचं नाव आहे. विशेष म्हणजे आरोपी गेल्या दोन महिन्यांपासून मुलीचा पाठलाग करत होता. मुलीने याबाबत आपल्या आईलाही सांगितलं होतं. त्यानंतर शाळा प्रशासनालाही सांगितली होतं (11 year old girl fought with kidnapper video goes viral).
पोलिसांकडून मुलीच्या धाडसाचं कौतुक
मुलीची आई दररोज मुलीला बस स्टॉपवर सोडायला जायची. मात्र, मंगळवारी नेमकं काही कारणास्तव मुलगी एकटी बस स्टॉपवर गेली. याच गोष्टीची संधी साधून आरोपीने मुलीचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला. पण तो त्यात अयशस्वी ठरला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विरोधात अल्पवयीन मुलांचं अपहरण करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे पोलिसांनी मुलीच्या धाडसाचं कौतुक केलं आहे.
घटनेचा व्हिडीओ बघा :
TERRIFYING: An 11-year-old girl fights back her kidnapper. A man has been arrested after attempting to kidnap the girl who was waiting at a bus stop in West Pensacola, Florida, on Tuesday: https://t.co/z5cDMXhVJa
?: Escambia County Sheriff’s Office pic.twitter.com/Q5Esfi4vl8
— John-Carlos Estrada (@Mr_JCE) May 19, 2021
हेही वाचा : VIDEO | वाहतूक पोलिसाचा चांगुलपणा; रस्त्याशेजारील मुलांना दिले स्वत:च्या डब्यातील जेवण