मुंबई : कधी काय घडेल आणि कोण काय करेल याचा काही नेम नाही! एका पुरुषाने नऊ महिलांशी लग्न केल्याचं उदाहरण ताजं असतानाच आता आणखी एक अशीच चकित करणारी घटना समोर आली आहे. एका व्यक्तीचा दावा आहे की तो 47 मुलांचा बाप बनला आहे. लवकरच आणखी 10 मुलांचा पिता होणार आहे. विशेष म्हणजे या तरूणाचं वय केवळ 30 वर्ष आहे. काइल गॉर्डी (Kyle Gordy) असं या व्यक्तीचं नाव आहे. ही व्यक्ती अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये राहाते. त्याने दावा आहे की तो लवकरच 57 मुलांचा पिता होणार आहे. याची सध्या सोशल मीडियावर चर्चा (viral news) आहे.
एका व्यक्तीचा दावा आहे की तो 47 मुलांचा बाप बनला आहे. लवकरच आणखी 10 मुलांचा पिता होणार आहे. विशेष म्हणजे या तरूणाचं वय केवळ 30 वर्ष आहे. काइल गॉर्डी असं या व्यक्तीचं नाव आहे.
‘द मिरर’ने याबाबत वृत्त दिलं आहे. त्यांच्या रिपोर्टनुसार, केल गॉर्डी आतापर्यंत 47 हून अधिक मुलांचा बाप बनला आहे. केल म्हणतो की काही वर्षांपूर्वी त्याच्या वैयक्तिक आयुष्यात स्थैर्य नव्हतं. त्याने अनेक तरूणींना डेट केलं. पण तो कुणासोबतही जास्त काळ रिलेशनशिपमध्ये राहू शकला नाही.
काइल गॉर्डी हा स्पर्म डोनर आहे. त्यामाध्यमातून त्याने आतापर्यंत 47 बालकांना जन्म दिला आहे.लवकरच आणखी 10 मुलांचा पिता होणार आहे. यासाठी तो आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतो. ते कॅफिन, अल्कोहोल, ड्रग्ज आणि सिगारेट या गोष्टींचं सेवन टाळतो. त्याला कायमस्वरूपी स्पर्म डोनर म्हणून काम करायचं आहे. तो त्याच्या इन्स्टाग्रामच्या माध्यमातून गरजूंशी संपर्क करतो. त्याने दावा आहे की आतापर्यंत 1000 हून अधिक महिलांनी त्यांच्याकडे शुक्राणूंची मागणी केली आहे.
ब्राझीलमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने 9 महिलांशी लग्न करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. आर्थर ओ उर्सो असं या तरूणाचं नाव आहे. त्याचा त्याच्या बायकांसोबतचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. नऊ बायका म्हटल्यावर कुणाला किती वेळ द्यायाचा हा त्याच्यासमोर होता. त्यावरही त्याने उत्तर शोधून काढलंय. त्याने यासाठी एक विशेष टाईमटेबल प्लॅन केलंय. त्यानुसार तो प्रत्येकीला वेळ देत होता. पण मग हे टाईमटेबल फॉलो करायला त्याला अडचणी येत होत्या. त्यामुळे त्याने या टाईमटेबलला केराची टोपली दाखवली.