2 कोटी 38 लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला… तो महिलेच्या जवळ आला आणि म्हणाला…
सोफी जेन नावाच्या 42 वर्षांच्या एका आकर्षक महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत, एका 18 वर्षांच्या तरुणाने तिचा मोबाइल नंबर मागितल्याची घटना दाखवली आहे. सोफी एक वकील आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

काही महिलां इतक्या सुंदर आणि आकर्षक असतात की त्यांच्या खऱ्या वयाचा अंदाज लावणंही कठीण होतं. अशा परिस्थितीत मोठ्या वयाच्या लोकांनाही सोडाच, काही वेळा तरुण देखील त्यांना फक्त बघत राहतात. काही वेळा तर अशा महिलांकडे लहान मुलं आकर्षित होऊन त्यांना मिळवण्याची इच्छा करू लागतात. अलीकडेच चीनमध्ये एक असाच प्रकार समोर आला होता. एका मुलाचं त्याच्यासोबत शिकणाऱ्या मुलीच्या आईवर प्रेम जडलं. मैत्रीणीच्या आईचं सौंदर्य पाहून हा पठ्ठ्या घायाळच झाला होता. काही वर्षांनंतर दोघांनी लग्न केलं. आज आम्ही तुम्हाला अशीच एक महिला दाखवणार आहोत. रस्त्यावर ही महिला फिरायला गेली असताना तिच्या सौंदर्याला पाहून एक 18 वर्षांचा मुलगा फिदा झाला. हा मुलगा तिच्याकडे गेला आणि चक्क त्याने तिला मोबाईल मागितला. त्यानंतर महिलेनं त्याला सत्य सांगितलं, तरीही तो थांबला नाही. त्या मुलाने तिचा ईमेल मागितलाच.
इंस्टाग्रामवर या महिलेचा व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या महिलेचं नाव सोफी जेन (Sofie Jane) आहे. ती एक वकील आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. 42 वर्षांच्या सोफीला आई असण्याचा अभिमान आहे. तसेच ती वरचेवर इंस्टाग्रामवर बिकिनी फोटोज देखील शेअर करते. अलीकडेच तिने एक व्हिडिओ शेअर केला, त्यात तिने सांगितलं की, तिला 18 वर्षांचा एक मुलगा भेटला, तो हळूहळू तिच्या जवळ आला आणि मोबाइल नंबर मागू लागला. त्या मुलाला कदाचित सोफीचा बोल्ड अंदाज आणि सौंदर्य आवडलं असावं. त्यानंतर सोफीने त्या मुलाला सांगितलं की, तिचं वय 42 आहे आणि तिला मुले देखील आहेत. पण त्या मुलाला या गोष्टीने कदाचित काही फरक पडला नाही. मोबाइल नंबर ऐवजी त्याने सोफीला सांगितलं की, “मग तुमचा ईमेल अॅड्रेसच द्या.”
सोशल मीडियावर तुफान व्हायरल
पण सोफीने त्या मुलाला मोबाइल नंबर आणि ईमेल दिले का नाही, याबद्दल काहीच सांगितलं नाही. पण तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आहे. सोफीच्या या व्हिडिओला 2 कोटी 38 लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. याशिवाय लाखो लोकांनी या व्हिडिओला लाइक आणि शेअर केले आहे. त्याचबरोबर व्हिडिओवर प्रचंड कमेंट्स आल्या आहेत.
त्याने नंबर मागितला आणि तुम्ही?
या कमेंटमधून बहुतेकांनी सोफीची खिल्ली उडवली आहे. व्हिडिओवर कमेंट करताना वैली ग्रीनने लिहिलं आहे, “कल्पना करा की तुम्ही 42 वर्षांचे आहात आणि इंटरनेटवर हे दाखवण्याचा प्रयत्न करताय की 18 वर्षांच्या मुलाने तुमचा नंबर मागितला आहे. ही सन्मानाची बाब आहे? मग ही अत्यंत किरकोळ बाब आहे.” बॉबने लिहिलं आहे, “नाही, त्या मुलाने असं केलं नसेल. स्नॅपचॅट आल्यानंतर 18 वर्षांच्या तरुणांनी कोणाचा नंबर मागितलेला नाही.” तर स्टेला म्हणाली, “त्याने नंबर मागितला आणि तुम्ही ती घटना इंस्टाग्रामवर पोस्ट केली?”