ऑस्ट्रेलिया(Australia)तील मेलबर्न(Melbourne)मध्ये एका सहा वर्षांच्या मुलीनं तिच्या दोन लहान भावंडांसह 5 कोटी रुपयांचं पहिलं घर विकत घेतलंय. तिन्ही मुलांनी पॉकेटमनीतून दीड लाख रुपये वाचवले आणि बाकीची मदत वडिलांनी केली. यानंतर तीन मुलं अधिकृतपणे 5 कोटींच्या घराचे मालक बनलेत. मुलगी म्हणाली, माझं नाव रुबी आहे आणि मी सहा वर्षांची आहे. मी माझं पहिलं घर खरेदी करणार आहे.
या मुलांनीही पैसे मिळवण्यासाठी वडिलांच्या कामात मदत केली. तिन्ही मुलांनी स्वतःच्या खिशातून 2-2 हजार डॉलर्स वाचवले होते. यानंतर त्यांच्या वडिलांनीही त्यांना मदत केली, त्यानंतर आता ते जवळपास 5 कोटींच्या घराचे मालक आहेत. रुबी, गस आणि लुसी नावाच्या या तीन भावंडांनी ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्नपासून 48 किमी अंतरावर असलेल्या क्लाइड (क्लाइड, मेलबर्न) इथं हे घर घेतलंय. त्यांच्या वडिलांनी त्यांना हे घर घेण्याचा सल्ला दिला.
या मुलांचे वडील कॅम मॅक्लेलन (Cam McLellan)यांनी सांगितले, की त्यांनी आपल्या मुलांना मालमत्ता खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित केलं होते. या घराची एकूण किंमत आता 5 कोटींहून अधिक आहे. पण येत्या 10 वर्षांत त्याची किंमत जवळपास दुप्पट होईल. डेली मेलनुसार, कॅम मॅक्लेलन हे प्रॉपर्टी कंपनी ओपन कॉर्पचे सहसंस्थापक आहेत. त्यांनी नुकतंच गुंतवणुकीबद्दल एक पुस्तक लिहिलंय.
या मुलांनी वडिलांना घरातल्या कामात मदत केली, त्यातून त्यांना पॉकेटमनी मिळाला. वडिलांचं ‘माय फोर इयर ओल्ड, द प्रॉपर्टी इन्व्हेस्टर’ या पुस्तकासाठीही मदत केली. हे पुस्तक बेस्ट सेलर पुस्तक आहे. जे कॅम यांनी त्यांच्या मुलांना समर्पित केलंय. हे पुस्तक नोव्हेंबरमध्ये लाँच करण्यात आलं.