काय सांगता ! ब्रोकोली तोडण्यासाठी मजुरांना तब्बल 63 लाख रुपयांचं पॅकेज, जाहिरातीची एकच चर्चा
या जगात असे एक ठिकाण आहे, जिथे मजुरांना प्रतिवर्ष तब्बल 63 लाख रुपये दिले जातात. हे कदाचित तुम्हाला अशक्य वाटेल. पण इंग्लंडमधील लिंकनशायर या भागात ब्रोकोली तोडण्यासाठी एक कंपनी मजुरांना तब्बल 63 लाख रुपये प्रतिमहिना देत आहे.
लिंकनशायर : आपल्या देशात मजूर, शेतकरी होणं कोणालाही पसंद नाही. तशी इच्छादेखील कोणी व्यक्त करत नाही. मात्र, या जगात असे एक ठिकाण आहे, जिथे मजुरांना प्रतिवर्ष तब्बल 63 लाख रुपये दिले जातात. या गोष्टीवर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण इंग्लंडमधील लिंकनशायर या भागात ब्रोकोली तोडण्यासाठी एक कंपनी मजुरांना तब्बल 63 लाख रुपये प्रतिमहिना देत आहे. (63 lakh package for broccoli and vegetable pickers online advertise went viral on social media)
वर्षाला मजुरी मिळणार तब्बल 63 लाख रुपये
लिंकनशायर या भागात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. असे असले तरी येथे सध्या मजुरांची कमतरता भासत आहे. हीच कमी भरुन काढण्यासाठी फार्मिंग ग्रुप टीएच क्लेमेंट्स ने मजुरांना प्रति तास 30 पौंड रुपये देण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे या मजुरांना फक्त ब्रोकोली, तसेच इतर भाज्या तोडायच्या आहेत. कंपनीकडून मजुरांना प्रति तास 30 पौंड म्हणजे वर्षाला तब्बल 62 हजार पौंड रुपये दिले जाणार आहेत. याचे भारतीय मुल्य तब्बल 63 लाख रुपये होते.
भाजी तोडण्यासाठी मजुरांची गरज
फळभाज्यांचा पुरवठा करणारे तसेच सुपरमार्केटला भाज्या पुरविण्यासाठी बोस्टन येथील लिंकनशायर येथे मजुरांची गरज आहे. या मजुरांकडून ब्रोकली तसेच इतर फळभाज्या तोडून घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी मजूर हवे आहेत अशी जाहिरात निघाली आहे. या मजुरांना प्रतितास 30 पौंडपर्यंत वेतन दिले जाणार आहे.
काम झाल्यानंतर मुजरांना मिळते आईसक्रीम
ही जाहिरात तसेच मजुरांची गरज याविषयी टीएच क्लेमेंट्स या कंपनीने सोशल मीडियावर एक पोस्टदेखील केली आहे. ‘ब्रोकोली तोडण्यासाठी आम्ही काही मजुरांच्या शोधात आहोत. या कामासाठी आम्ही प्रतितास 30 पौंड देण्यास तयार आहोत,” असे या पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे काम झाल्यानंतर मजूर आईसक्रीम खात असल्याचा एक फोटोदेखील टीएच क्लेमेंट्सने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.
जाहिरातीची एकच चर्चा
दरम्यान, पिकाची कापणी आणि तोडण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात वेतन देणारी टीएच क्लेमेंट्स ही काही एकटीच कंपनी नाही. याआधी अनेक दुसऱ्या कंपन्यांनी मजुरांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक वेतन दिलेले आहे. टीएच क्लेमेंट्स कंपनीची ही जाहिरात सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. ज्या कोणाला ही ऑफर आवडली असेल, त्यांनी कंपनीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर जावे. तसेच ही ऑफर स्वीकारावी असे लोक मिश्किलपणे म्हणत आहेत.
इतर बातम्या :
Video : माकडाने कुत्र्याला शिकवला चांगलाच धडा, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित!
Video: झोक्यावरुन उडी आणि थेट पायजम्यात, हरहुन्नरी लोकांचे कर्तब पाहून नेटकरी अवाक
Video: वरमाला टाकताना वधूची उंची कमी पडली, तेव्हा वराने जे केलं, ते पाहून लोकांनी त्याचं कौतुक केलं!
PM पोषण शक्ती निर्माण योजना सरकार सुरू करणार, 5 वर्षांपर्यंत करोडो मुलांना मोफत अन्न#AatmanirbharBharatAbhiyan #CabinetMeeting #MidDayMealNews #MissionPoshan20 #PiyushGoel https://t.co/YSqpti2L5F
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 29, 2021
(63 lakh package for broccoli and vegetable pickers online advertise went viral on social media)