7 वर्षाच्या मुलाकडून वडिलांवरच egg drop challenge, पुढे जे झालं, त्याने लोक पोट धरुन हसले!
वडील आणि मुलाचा हा व्हिडिओ ट्विटरवर 10 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. अनेक युजर्सने हा व्हिडीओ रिट्विटही केला आहे.
सोशल मीडियावर दररोज अनेक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही पाहिल्यानंतर तुम्ही भावनिक होतात तर काही व्हिडिओ इतके मजेदार असतात की ते पाहिल्यानंतर तुम्ही पोट धरुन हसता. लहान मुलांचे अनेक व्हिडीओ इंटरनेटवर आहेत, जे खूप मजेदार असतात. सध्या असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हीही या 7 वर्षांच्या मुलाची कौतुक कराल. वडील आणि मुलाचा हा व्हिडिओ ट्विटरवर 10 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. अनेक युजर्सने हा व्हिडीओ रिट्विटही केला आहे. ( 7-year-old-son-performs-egg-drop-trick-on-his-fathers-forehead-see-what-happened-next )
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये मुलगा आणि वडील एग ड्रॉप चॅलेंज करताना दिसत आहेत. हा मुलगा वडिलांच्या तोंडावर पाण्याने भरलेला ग्रास ठेवतो, त्यावर एक प्लेट ठेवतो, त्यावर एक छोटी नळी ठेवतो, आणि त्यावर न उकडलेलं अंड ठेवलं जातं. आता या चॅलेंजमध्ये प्लेट अंड्याला हात न लावता, फक्त प्लेट सरकवून हे अंड पाण्याने भरलेल्या ग्लासमध्ये पाडायचं आहे. हा मुलगा प्लेटला एक झटका देतो आणि आश्चर्य काय की, ही प्लेट सरकल्यानंतर अंड थेट वडीलांना तोंडावर ठेवलेल्या पाण्याने भरलेल्या ग्लासात पडतं.
पाहा व्हिडीओ:
WATCH: 7-year-old performs egg drop trick on his dad’s forehead! https://t.co/EwNfG4WPju pic.twitter.com/lmUWyazf4I
— Good Morning America (@GMA) September 30, 2021
हे पाहिल्यानंतर या 7 वर्षाच्या मुलाला खूप आनंद होतो.अगदी योग्य पद्धत वापरल्याने हे शक्य झालं. तेवढ्यात खाली झोपलेले वडीलही याचं क्रेडीट घेऊ पाहतात, तेव्हा हा खोडकर मुलगा ज्या ग्लासात पाणी आणि अंडं आहे, ते पाणी थेट वडिलांच्या चेहऱ्यावर टाकतो आणि तिथून धूम ठोकतो. हा व्हिडीओ कदाचित या मुलाच्या आईने शूट केला आहे. मुलगा, वडील आणि आईचं हे नातं नेटकऱ्यांना चांगलंच भावलेलं दिसतं आहे. हे चॅलेंज आणि त्यानंतरचा प्रँकही लोकांना आवडला आहे.
58 सेकंदाचा हा व्हिडिओ ट्विटरवर गुड मॉर्निंग अमेरिका नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. जो 10 हजाराहुन अधिक लोकांनी पाहिला आहे.
हेही पाहा: