80 वर्षांपूर्वीचा पाचवीचा पेपर तुफान व्हायरल, एका IAS ऑफिसरने पेपर टि्वट करत म्हटलं…
80 Years Old Question Paper : सोशल मीडियावर स्वातंत्र्यापूर्वीचा पाचवीची प्रश्नपत्रिका व्हायरल झाला आहे. या पेपरमधील प्रश्न पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. त्या काळात विद्यार्थ्यांची कशी कसोटी लागत असणार? हे यामधून स्पष्ट होत आहे.
मुंबई : सध्या पाचवी वर्गाचा एका प्रश्नपत्रिकेची चर्चा चांगलीच सुरु आहे. एका निवृत्त आयएएस अधिकाऱ्याने हा पेपर टि्वट केला आहे. बद्रीलाल स्वर्णकार यांनी टि्वटवर हा पेपर दिला आहे. त्याला सोशल मीडियातील युजर्सकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. 80 वर्षांपूर्वी म्हणजेच देश स्वातंत्र होण्यापूर्वी पाचवीचा असलेला अभ्यासक्रम पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. 1943-44 मधील सहामाही परीक्षेचा हा पेपर आहे.
सध्याची शिक्षणपद्धत आणि जुनी पद्धत
सध्याच्या शिक्षण पद्धतीत राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीएसईसह अनेक बोर्ड दहावीनंतर कॉमर्स विषयाचा पर्याय देतात. परंतु सेवानिवृत्त आयएएस अधिकारी बद्रीलाल स्वर्णाकर यांनी सोशल मीडियावर 80 वर्षांचा कॉमर्स पेपर शेअर केला आहे. हा पेपर इयत्ता 5वीच्या सहामाही परीक्षेचा आहे.
Look at the standard of #Class_V papers in the half yearly #examination in 1943-44 in #India. The #matric_system has made the system so easy! pic.twitter.com/kMYoP2fgnL
— Badri Lal Swarnkar IAS (Retired) (@BLSwarnkar2) May 2, 2023
पाचवीत कॉमर्स विषय
स्वर्णकार यांनी शेअर केलेल्या या पोस्टसमोर स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरच्या शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या प्रश्न त्यानंतर युजर्स विचारत आहे. अनेकांना 5वी मध्ये कॉमर्स शिकवले जात असल्याबद्दल आश्चर्य वाटत आहे.
उत्तीर्ण होण्यासाठी 33 गुण
1943-44 च्या पेपरसाठी कमाल गुण 100 आहेत आणि उत्तीर्ण गुण 33 आहेत. नमूद केलेल्या परीक्षेचा कालावधी अडीच तासांचा होता. एका प्रश्नात सोन्याचे मूल्य ठरवण्यास सांगितले होते. दुसरा प्रश्न खर्च झालेल्या पैशाबद्दल विचारला आहे. विद्यार्थ्यांना आणखी एका प्रश्नासह व्यवसायावर पत्र लिहिण्यास सांगण्यात आले आहे. प्रश्न इतके अवघड असतील तर परीक्षेत नक्कीच अनेक जण नापास होतील, असे अनेक युजर्सने म्हटले आहे.