डॉक्टरांपुढे प्रश्न, ही मुलगी रडते तेव्हा डोळ्यातून अश्रृ नव्हे वाहतात…
या आजाराशी लढण्यासाठी तिने जागतिक दर्जाचे तज्ज्ञांची मदत मागितली आहे. पण, अद्याप तिच्यावर योग्य पद्धतीचे उपचार झालेले नाहीत.
कोलंबिया : कोलंबियाच्या एका मुलीची धक्कादायक कहाणी समोर आली आहे. बैरेंक्लिलाच्या जारीक रामीरेजला दुर्मीळ घटनेशी लढावे लागत आहे. ती रडते तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रृ नाही तर रक्त बाहेर पडते. तुम्ही खरं समजा किंवा समजू नका पण, हे सत्य आहे. मार्का या वेबसाईटवर ही स्टोरी प्रकाशित झाली आहे. जारीकने आपल्या असामान्य स्थितीविषयी सर्वांना सांगितलं. या आजाराशी लढण्यासाठी तिने जागतिक दर्जाचे तज्ज्ञांची मदत मागितली आहे. पण, अद्यात तिच्यावर योग्य पद्धतीचे उपचार झालेले नाहीत. त्यामुळे तिचे आयुष्य अतिशय खडतर पद्धतीने जात आहे.
तीन वर्षांपूर्वी २०२० मध्ये जगात कोरोनाची एंट्री झाली. तेव्हा या मुलीला हा आजार झाला. तिच्या नाकातून रक्त वाहू लागले. नंतर डोळ्यातूनही रक्त वाहू लागले. आता तोंडातूनही रक्त वाहायला लागले. ती रडते तेव्हा तिच्या डोळ्यातून रक्त वाहू लागते.
डॉक्टरांचं म्हणणं काय?
ऑप्थलमोलोजीस्ट लुइस एक्काफने सांगितले की, दुर्मीळ स्थितीत याला विकेरीयस मेंस्ट्रूएशन म्हणतात. मासीक पाळीदरम्यान गर्भाशयाएवजी शरीरातील अन्य भागातून रक्तस्त्राव होतो. कान, नाक, निपल्स, पाय येथून रक्तस्त्राव होतो.
रक्तस्त्रावाची धक्कादायक घटना
जारीकने सांगितले की, मार्च २०२० नंतर तिचे आयुष्य पूर्णपणे बदलले. आता ती सुरुवातीसारखी सामान्य स्थितीत नाही. कोणतेही तज्ज्ञ तिच्या आजारावर उपाय शोधू शकले नाही. शारीरिकदृष्या मी बरी आहे. पण, रक्तस्त्रावाची घटना धक्कादायक आहे.
तज्ज्ञही शोधू शकले नाही उपाय
दुर्दैवाने जारीकला मदत मिळत नाही. या तिच्या आजारामुळे शैक्षणिक नुकसान होत असल्याचं शिक्षकांनी सांगितलं. गेल्या दोन वर्षांपासून ती दुःखी आहे. पण, तिच्यावर योग्य पद्धतीने उपचार अद्याप झाले नाहीत. तज्ज्ञ डॉक्टरही या तिच्या समस्येवर उपाय शोधू शकले नाही.
या समस्येवर कुणी तज्ज्ञ डॉक्टर काही उपाय शोधतात, का हे पाहावं लागेल. ही अतिशय दुर्मीळ घटना आहे. पण, अशावेळी काय करायचे, असा प्रश्न जारीकला पडला आहे. सध्या तिची ही स्टोरी व्हायरल होत आहे.