एका बॅचलर पार्टीमुळे मोडलं लग्न, पार्टीत असे काय झाले? वाचा सविस्तर
या महिलेने ही सर्व कैफीयत सोशल मीडियावर मांडत लोकांना मदतीचे आवाहन केले आहे. तीन आठवड्यांनी होणारे तिचे लग्न मोडले असल्याची ती यात सांगत आहे. होणाऱ्या नवऱ्याच्या बॅचलर पार्टीची काहणी ऐकून तिने लग्नाला नकार दिला आहे.
मुंबई : राज्यात सध्या लगीनसराईचा धूम धडाका सुरू आहे. तुम्ही तुमच्या आसपास अनेक लग्नसोहळे बघत असला. अनेक लोक लग्नाआधी बॅचलर पार्टी करतात, आता बॅचलर पार्टी करणे जणू ट्रेंड बनले आहे. अशावेळी बॅचलवर पार्टीसाठी अनेकदा मित्र मंडळी सरप्राईज प्लॅन बनवतात. मात्र मित्रांचा हाच प्लॅन एका तरुणाच्या जास्तच अंगलट आला आहे. कारण त्या बॅचलर पार्टीने त्याचे लग्न मोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. होणाऱ्या नवऱ्याची बॅचलर पार्टी ऐकूण होणाऱ्या नवरीने चक्क लग्नालाच नकार दिला आहे.
बॅचलर पार्टीत काय झालं?
या महिलेने सांगितल्याप्रमाणे ती तिच्या मैत्रणींसोबत एका सुंदर ठिकाणी असलेल्या कॅबिनमध्ये पार्टी एन्जॉय करत करत होती. जिथे ती स्पाचाही करून घेणार होती. तिच्या नवऱ्याने आणि त्याच्या मित्रांनीही असेच करण्याचे ठरवले होते. मात्र जेव्हा तिचा होणारा नवरा पार्टीतून परत आला, त्यावेळी त्याने नवरीला सांगितले की, त्याच्या मित्रांनी त्याला न सांगताच त्याची बॅचलर पार्टी एका स्ट्रिप क्बमध्ये ठेवली होती. हे ऐकूण त्या महिलेला धक्काच बसला. यावरून त्या दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि ती महिला रागावून तिच्या नातेवाईकांकडे निघून गेली.
महिलेने सोशल मीडियावर मांडली कैफीयत
या महिलेने ही सर्व कैफीयत सोशल मीडियावर मांडत लोकांना मदतीचे आवाहन केले आहे. तीन आठवड्यांनी होणारे तिचे लग्न मोडले असल्याची ती यात सांगत आहे. नातेवाईकांकडे गेलेल्या या संतापलेल्या नवरीने चक्क लग्नाला नकार देऊन टाकला. तिच्या नातेवाईकांनी तिला समजावण्याचा प्रयत्नही केला मात्र तिने त्याचेही ऐकले नाही. त्या तरुणाने तिची माफीही मागितील मात्र त्याचाही काही उपयोग झाला नाही, ती महिला तिच्या निर्णयावर ठाम राहिली आहे. तुम्हीही बॅचलर पार्टी करणार असाल तर4 एकदा आपल्या होणाऱ्या जोडीदाराचे मत जाणून घ्यायला विसरू नका, नाहीतर ऐन वेळी पंचायत होते.