Viral Video : साप आणि खारुताईमध्ये जबरदस्त लढाई, कुरतडून कुरतडून खाल्ले सापाला

अवघ्या 19 सेकंदांचा हा व्हिडिओ आयएफएस सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, जर तुम्ही सापाला गिळताना कोणतीही खारुताई पाहिली नसेल तर आता एकदा हा व्हिडिओ पहाच.

Viral Video : साप आणि खारुताईमध्ये जबरदस्त लढाई, कुरतडून कुरतडून खाल्ले सापाला
साप आणि खारुताईमध्ये जबरदस्त लढाई
Follow us
| Updated on: Oct 06, 2021 | 8:30 PM

नवी दिल्ली : सोशल मीडियाच्या जगात अनेक मजेदार व्हिडिओ नेहमी व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ असे आहेत की, ते पाहिल्यानंतर तुमचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणे खूप कठीण आहे. सध्या ट्विटरवर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एक खारुताई आणि साप यांच्यात भयंकर लढाई पहायला मिळत आहे. पण या लढाईचा निकाल अतिशय धक्कादायक आहे. (A fierce battle between the snake and the squirrel, the snake ate by biting)

तसे, सापाला पाहून अनेकांची घाबरगुंडी होते. माणसांना काय, प्राण्यांनाही त्यांची इतकी भीती वाटते की ते सापाला बघितल्यावर त्यांचा मार्ग बदलतात. पण साप आणि खारुताईचा असा एक व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल झाला आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

काय आहे व्हिडिओमध्ये ?

व्हायरल झालेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये एक छोटी खारुताई सापाशी लढताना दिसत आहे. पण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला असे वाटेल की, कदाचित सापाने खारुताईशी पंगा घेऊन चूक केली असेल. खारुताई सापाचा सामना करताना दिसत आहे. यानंतर जे घडते, जे पाहून कोणीही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. या लढाईत, खारुताई वारंवार सापाचे तोंड आपल्या पंजाने ओरखडत आहे. यानंतर, व्हिडिओच्या शेवटी, ती आपल्या दाताने सापाला कुरतडून कुरतडून खाऊन टाकते.

अवघ्या 19 सेकंदांचा हा व्हिडिओ आयएफएस सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, जर तुम्ही सापाला गिळताना कोणतीही खारुताई पाहिली नसेल तर आता एकदा हा व्हिडिओ पहाच. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण खारुताईच्या धाडसाचे कौतुक करत आहेत.

काय म्हणाले युजर्स?

तसेच, अनेक वापरकर्ते म्हणतात की, त्यांनी कधीही विचार केला नाही की खारुताई देखील मांसाहारी असू शकते. एका वापरकर्त्याने कमेंट करताना लिहिले आहे की, मला नेहमी असे वाटत असे की खारुताई शाकाहारी आहे. एका विषारी सापाला तिने कसे हाताळले? तसेच, अन्य एका वापरकर्त्याने लिहिले आहे की, माझा यावर विश्वास बसत नाही. हे कमाल होते. (A fierce battle between the snake and the squirrel, the snake ate by biting)

इतर बातम्या

Bank Holidays in October 2021: उद्या नवरात्रीपासून 17 दिवस बँका बंद, जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Cabinet Decision : सार्वजनिक वितरणाच्या तांदळाच्या वाहतुकीसाठीच्या खर्च तरतूदीला मान्यता, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.