मोदींनी सोडलेले चित्ते करणार या बोकडाची शिकार, पण लय दमदार हाय बोकडाचं रेकॉर्ड!

ऐनवेळी हा बोकड असं काही करतो, की बिबट्यातर जाळ्यात येतो, पण बोकड सहीसलामत सुटतो.

मोदींनी सोडलेले चित्ते करणार या बोकडाची शिकार, पण लय दमदार हाय बोकडाचं रेकॉर्ड!
20 वेळा बिबट्यांकडून वाचला, आता चित्त्यांसमोर जाणार
Follow us
| Updated on: Sep 20, 2022 | 3:32 PM

मुंबई:पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) त्यांच्या 72 व्या जन्मदिनी, मध्य प्रदेशातल्या कुनो नॅशनल पार्कमध्ये (Cheetah in Kuno National Park) 8 चित्त्यांना सोडलं. आता हे चित्ते इथल्या अधिवासात राहून शिकारही करणार आहे. मात्र, त्यांना शिकार मिळण्यासाठी चांगलंच झुंजावं लागणार आहे. कारण, चित्त्यांच्या शिकारीसाठी अशा एका बोकडाला (Gaot) सोडलं जाणार आहे, ज्याचा रेकॉर्ड लय दमदार आहे.

अंगावर काळे-पांढरे चट्टे असणारा हा बोकड आता कुनो नॅशनल पार्कमध्ये बिबट्यांसमोर सोडला जाणार आहे. या बोकडाला याआधीही अनेक शिकाऱ्यांसमोर सोडण्यात आलं होतं, मात्र त्याची कुणीही शिकार करु शकलं नाही.

चित्त्याहूनही भयानक असणाऱ्या बिबट्यांना पकडण्यासाठी शिकार म्हणून या बोकडाला पिंजऱ्यात बंद करण्यात आलं होतं. मात्र ऐनवेळी हा बोकड असं काही करतो, की बिबट्यातर जाळ्यात येतो, पण बोकड सहीसलामत सुटतो.

हे सुद्धा वाचा

याआधी 20 वेळा या बोकडाला बिबट्यासमोर सोडण्यात आलं होतं. तिथून हा बोकड अलगद निसटला. हेच काय, तर कुनो नॅशनल पार्कमध्ये जेव्हा चित्ते आणले जाणार होते, त्याच्या महिनाभर आधी बिबट्यांना या परिसरातून स्थलांतरीत करायचं होतं. पण बिबटे काही जाळ्यात येत नव्हते.

हा तो बोकडं!

viral gaot cheetah

20 वेळा बिबट्यांपासून वाचणारा हाच तो बोकड

शेवटी नॅशनल पार्क प्रशासनानं या बोकडाची मदत घेतली. यावेळी या बोकडाचा नक्की बळी जाणार असं सगळ्यांना वाटत होतं. पण इथंही बोकड आपल्या रेकॉर्डला जागला, आणि बिबटे तर जाळ्यात आले, पण हे महाशय सुटले.

बकरे की माँ कबतक खैर मनाएगी? अशी हिंदीत एक म्हण आहे, मात्र ही म्हण खोटी ठरवण्याचं काम आतापर्यंत तरी हा बोकड करत आला आहे. ते काहीही असो, पण हा बोकड जीवनाबद्दल किती आशादायी असावं, याची नक्कीच प्रेरणा देतो.

माणूस आयुष्यात छोट्या संकटांनीही खचून जातो, आयुष्याबद्दलचं त्यांचं प्रेम कमी होत जातं, पण संकटातही एखाद्या शिळेप्रमाणे कणखर राहण्याची प्रेरणाच हा बोकड देतो. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोडलेले 8 चित्ते तरी या बोकडापुढे नमतात, की त्याला नमवतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.