Video: श्वास उखडत होता, पण आस नाही, जखमी माकडाला तोंडाने श्वास देऊन मरणाच्या दारातून परत आणलं!

हा व्हिडीओ तामिळनाडूतील पेरमबालूर इथला आहे. जिथं प्रभू नावाचा व्यक्ती चक्क सीपीआर देऊन माकडाचे प्राण वाचवताना दिसत आहे.

Video: श्वास उखडत होता, पण आस नाही, जखमी माकडाला तोंडाने श्वास देऊन मरणाच्या दारातून परत आणलं!
जखमी माकडाला सीपीआर देताना प्रभू
Follow us
| Updated on: Dec 14, 2021 | 12:43 PM

आजच्या जगात माणुसकी शोधून सापडत नाही, जो तो आपापला स्वार्थ पाहण्यात गुंतला आहे. कुणाला कुणाचं देणं घेणं पडलेलं नाही, नाती संपत चालली आहेत, हेच चित्र सगळीकडे दिसतं. पण अशातच असे काही व्हिडीओ व्हायरल होतात, जे माणसाच्या काळजाचा वेध घेतात, आणि पुन्हा तो माणूस आहे, त्याला सर्वांची काळजी करणारं एक हृदय आहे याची जाणीव करुन देतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे, या व्हिडीओमध्ये एक अवलिया चक्क सीपीआर (Injured Monkey Getting CPR) देऊन माकडाचे प्राण वाचवताना दिसत आहे. हा व्हिडीओ तामिळनाडूतील आहे. जिथं एका अवलियाने तोंडाने श्वास देऊन चक्क एका माकडाचे प्राण वाचवले. ( a man named Prabhu saved the life of an injured monkey by giving CPR In Tamil Nadu. Also appreciated by cricketer R Ashwin)

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ तामिळनाडूतील पेरमबालूर इथला आहे. जिथं प्रभू नावाचा व्यक्ती चक्क सीपीआर देऊन माकडाचे प्राण वाचवताना दिसत आहे. ही घटना 10 डिसेंबरला पेरमबालूरमधीलऑथियम समायुवापुरम नावाच्या गावात घडली. जिथं काही कुत्र्यांनी अचानक एका माकडावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये माकड जखमी झालं, हे माकड काही वेळात मेलंच असतं, पण तितक्यात रस्त्याने जाणाऱ्या प्रभू यांची माकडावर नजर पडली आणि त्यांनी तातडीने माकडाला वाचवण्याचे प्रयत्न सुरु केले.

क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विननेही प्रभू यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. ट्विटरवर त्याने व्हिडीओ रिट्विट करत याला आशा म्हणतात असं लिहलं आहे. हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

प्रभू यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्यांनी माकडाची अवस्था पाहिली, तेव्हा त्यांना काहीच सुचलं नाही. या माकडाला कसं वाचवता येईल हा एकच विचार त्यांच्या मनात होता. आधी त्यांनी घटनास्थळी असणाऱ्या माकडांना पळवून लावलं आणि त्यानंतर माकडाला त्या जागेवरुन उचललं. नंतर एका झाडाच्या सावलीत नेऊन माकडाला झोपवलं. कुत्र्यांच्या हल्ल्यात माकड बेशुद्ध झालेलं होतं. त्याचा श्वास तुटत चालला होता. इथं त्यांनी 2010 ला घेतलेल्या फर्स्ट एड ट्रेनिंगचा फायदा झाला. त्यांनी माकडाला झोपवलं आणि त्याला तोंडाने श्वास देणं सुरु केलं.

आधी माकडाला पाठीवर झोपवण्यात आलं, नंतर त्याला सीपीआस देण्यात आला. प्रभू यांनी माकडाला तोंडाने श्वास देणं सुरु केलं. काहीवेळ सीपीआर दिल्यानंतर प्रभू यांनी माकडाच्या तोंडात पाणी टाकलं, त्यानंतर माकड शुद्धीत आलं. त्यानंतर या माकडाला दवाखाण्यात दाखल करण्यात आलं. हे माकड आता सुखरुप असून त्याला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

हेही पाहा:

Video: ‘भावा, लवकर जमिनीवर उतरव, माझं लग्न व्हायचंय अजून’, पॅराग्लायडिंग करणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ व्हायरल!

Video: कुत्र्याला वाचवण्यासाठी 2 पोलीस थेट बर्फाळ तलावात उतरले, त्यानंतर काय झालं पाहा..

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.