Video : धबधब्याखाली बसून अंघोळ करत होत इतक्यात वरून साप पडला, पुढे काय घडलं पाहा…
Discovery Engenharia या इन्स्टाग्रामवरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. याला आतापर्यंत एक लाखांहून अधिक लोकांनी पाहिलंय. तर 80 हजारांहून अधिक लोकांनी याला लाईक केलंय.
मुंबई : सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत. अश्यात अनेकजण आपल्या कुटुंबासह फिरायला जाताना दिसत आहेत. अश्यात बऱ्याचदा पाणी असलेली ठिकाणं म्हणजे धबधबे वगैरे असतील अशी ठिकाणं निवडली जात आहेत. त्यामुळे उन्हाची धग जास्त जाणवत नाही. पण असं फिरायला गेल्यावर आपल्यासोबत काही धक्कादायक प्रकार घडेल असं कुणाच्या ध्यानी मनीही नसतं. पण असाच काहीसा प्रकार एका व्यक्तीसोबत घडला आहे. तो मस्त धबधब्याचा (Waterfall) आनंद घेत होता. पण थोड्याच वेळात त्याच्या या आनंदावर विरझण पडतं. एक साप (Snake) या धबधब्यातून या तरूणाच्या अंगावर पडतो. त्यामुळे तो व्यक्ती अगदी घाबरून जातो. याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे.
व्हायरल व्हीडिओ
एक व्यक्ती मस्त धबधब्याचा आनंद घेत होता. पण थोड्याच वेळात त्याच्या या आनंदावर विरझण पडतं. एक साप या धबधब्यातून या तरूणाच्या अंगावर पडतो. त्यामुळे तो व्यक्ती एगदी घाबरून जातो. तो लगेच आपला जीव वाचवण्यासाठी तिथून पळतो. या संपूर्ण घटनेचा व्हीडिओ मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
Discovery Engenharia या इन्स्टाग्रामवरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. ही व्यक्ती सगळे टेन्श्स बाजूला सारून सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे. इतक्यात त्याच्या समोर हा साप पडतो. आधी त्या व्यक्तीचं लक्ष सापाकडे जात नाही. तो त्याच्या दुनियेत मग्न असतो. पण मग तिथे उपस्थित असलेले लोक ओरडू लागतात. त्या आवाजाने ही व्यक्ती घाबरते. अन् मग त्याची नजर सापाकडे जाते. मग तो तिथून निघून बाहेर येतो.
Discovery Engenharia या इन्स्टाग्रामवरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. याला आतापर्यंत एक लाखांहून अधिक लोकांनी पाहिलंय. तर 80 हजारांहून अधिक लोकांनी याला लाईक केलंय.