अतिमद्यपानामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला, 21 कॉकटेलचं आव्हान, 12 मध्ये झाला आऊट
वाढदिवसाची पार्टी सुरु असताना दोन महिलांनी आवाहन दिलं, त्यावेळी एका व्यक्ती मृत्यू झाला आहे. त्याची चर्चा सगळीकडे आहे.
मुंबई : दारु पिणं शरिरासाठी हानीकारक आहे. त्याच्याबाबत सध्या एक अशी बातमी आली आहे की, तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला सुध्दा धक्का बसला आहे. जमैकामध्ये एका तरुणाचा अतिदारु पिल्यामुळे (viral news) मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे 21 कॉकटेल पिण्याच्या नादात त्या व्यक्तीला मृत्यू झाला आहे. त्या व्यक्तीचं नावं टिमोथी साउदर्न असं आहे. तो खरतरं इंग्लंड (trending news) देशातील रहिवासी आहे. तो त्याच्या कुटुंबियांसोबत सुट्टीत आनंद घेण्यासाठी जमैकामध्ये (Jamaica) गेला होता. त्यावेळी ही दुर्घटना घडली आहे. 21 कॉकटेलचं पिण्याचं आव्हान त्याने स्विकारलं, पण 12 मध्ये तो कायमचा आऊट झाला आहे.
12 कॉकटेल घेतल्यानंतर…
विऑनच्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या व्यक्तीने एकाचवेळी 21 कॉकटेल दारु पिण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. टिमोथी साउदर्न असं त्या व्यक्तीचं नाव आहे, तो 53 वर्षाचा होता. तो इंग्लंड देशातील किंग्सटन येथील रहिवासी होता. सेंट ऐनमध्ये रॉयल डिकैमेरॉन क्लब कॅरेबियनमध्ये राहत होता. टिमोथी साउदर्न त्याच्या हॉटेलमधील रुममध्ये पोहोचण्यापुर्वी 12 वेगवेगळ्या पद्धतीच्या दारु प्यायला होता. 21 कॉकटेल पिण्याच्या आगोदर ती व्यक्ती बिअर पिली होती. त्या व्यक्तीची तिथं असलेल्या दोन महिलांशी मुलाखत झाली. त्या महिला तिथं जन्मदिन साजरा करीत होत्या. कॅनडाच्या महिलांनी त्या व्यक्तीसोबत 21 कॉकटेल पिण्याची शर्यत लावली.
श्वास गुदमला होता
त्या व्यक्तीच्या एका नातेवाईकाने सांगितलं की, श्वास गुदमला होता. ज्यावेळी तो ठीक होण्याच्या स्थितीत आला, त्यावेळी त्याने उलटी केली. त्यांनी त्या व्यक्तीला ठिक होण्याच्या स्थितीत ठेवलं होतं. त्याचबरोबर रुग्णवाहिका सुध्दा बोलावण्यात आली होती. त्याचवेळी तिथं एक नर्स आली, त्यावेळी त्या नर्सला विचारलं की, रुग्णवाहिका कुठे आहे तर तिने नाही म्हणून सांगितलं. त्यावेळी त्या व्यक्तीच्या शरिराचं तापमान कमी होऊ लागलं होतं. चौकशी केल्यानंतर त्याबाबत अधिक माहिती मिळाली नाही. त्याचा मृतदेह त्यांच्या देशात घेऊन जाण्यासाठी त्यांच्या कुटुंबाने मदत मिळण्यासाठी प्रयत्न केले. परंतु त्यांना कसल्याही प्रकारची मदत मिळाली नाही.