सामान्य माणसाला दोन हात, दोन पाय असतात. काहींच्या हाताला सहा बोटं असतात. तर काहींच्या पायाला सहा बोटं असतात. पण सर्वसामान्य व्यक्ती हा पाच बोट असलेल्या हातापायांचा आढळून येतो. त्यातही माणूस म्हटलं की दोन हात आणि दोन पायच असतात. त्यापेक्षा जास्त हात पाय असणारा माणूस सामान्य कसा काय असेल? पण एक फोटो सध्या व्हायरल झाला असून या फोटोतील चिमुकल्याला चक्क चार हात आणि चार पाय (A new born baby found with four hand and four legs) असल्याचं आढळून आलं आहे. हा प्रकार कळल्यानंतर लोकांनी जन्म घेतलेल्या बाळाला देवाचा अवतारच जन्माला आलाय की काय, असंही म्हटलंय. या मुलाचा फोटो सध्या व्हायरल झालाय. देवीदेवतांच्या फोटोंमध्ये त्यांचे चार हात पाहणं, वेगळी गोष्ट आहे. पण खरोखरंच जन्माला आलेल्या एका नवजात बाळाला चार हात असल्याचं पाहिल्यानंतर कुणालाही आश्चर्याचा धक्का बसेल. सोशल मीडियावर (Social Media) या मुलाचे फोटो वेगानं व्हायरल होत आहेत. या मुलाबाबतची नेमकी माहिती जाणून घेण्यासाठी अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार हा मुलगा बिहारमध्ये जन्मला असल्याचा दावा करण्यात आला आहे. बिहारच्या कटीहारमध्ये जन्मताच त्याला चार हाथ आणि चार पाय असल्याचं आढळून आलं आहे. दरम्यान, ही गोष्ट जशी आजूबाजूच्या लोकांना कळली आणि पेपरात छापून आली, तशी लोकांनी हॉस्पिटलमध्येच या मुलाला पाहण्यासाठी गर्दी करायला सुरुवात केली. आता तर सोशल मीडियातही या मुलाचा फोटो व्हायरल होऊ लागला आहेत.
#Bihar woman give Birth to a Baby with Four Hand and legs.#Incridible ?? pic.twitter.com/46vYk1D6JB
— MEWS (@mews_in) January 19, 2022
बिहारच्या कटीहारमध्ये असलेल्या एका स्थानिक रुग्णालयात या मुलाचा जन्म झाला आहे. या मुलाच्या जन्माची खबर मिळताच अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यानंतर या मुलाचं दर्शन घेण्यासाठी अनेकांनी रुग्णालयाच्या दिशेनं धाव घेतली. काहींना या मुलाचा जन्म म्हणून एक प्रकारचा चमत्कारच वाटतोय. काहींना तर हा देवाचा अवतारच वाटू लागला आहे. दरम्यान, डॉक्टरांनी मात्र हा मुलगा शारीरिकदृष्ट्या दिव्यांग असून ही एक दुर्मिळातली दुर्मिळ घटना असल्याचंही म्हटलंय. तसंच या मुलाचा जन्माला चमत्काराचं रुप सांगणं, हे देखील चुकीचं असल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय.
दुसरीकडे पश्चिम बंगालमधील असलेल्या या चिमुकल्याच्या वडीलांनी जन्माआधीच मुलाची तपासणी केली होती. अल्ट्रासाऊंड देखील केलं होतं.त्यावेळी डॉक्टरांनी मुलाची वाढ योग्य असल्याचं म्हटलं होतं. पण जन्मानंतर आता या मुलाची सगळीकडेच चर्चा रंगली आहे.
दरम्यान, बिहारच्या गोपालगंजमध्येही गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अशीच एक घटना समोर आली होती. एका मुलाला तीन हात आणि तीन पाय असल्याचं समोर आलं होतं. यानंतरही अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं.
Video | सेल्फीसाठी जीव धोक्यात! नदीत बुडत असलेल्या गाडीवर उभा राहून महिलेने घेतला सेल्फी
Video : चुकीला माफी नाही..! स्कूटीवर स्टंट करणं तरुणीला पडलं भारी; अशी काही आपटली, की…