दादासाहेब कारंडे, प्रतिनिधी, मुंबई : सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडिओ (Viral Video) समोर आला आहे. ज्यामध्ये प्राणीसंग्रहालयात पिंजऱ्यात अडकलेल्या सिंहासोबत (Lion Video) मजा करणे एका व्यक्तीला महागात पडले आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या व्यक्तीने मागचा पुढचा विचार न करता थेट पिंजऱ्यात हात घातला आहे, यानंतर जे काही घडलं ते पाहून कुणाचाही श्वास थांबेल. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. त्या व्यक्तीने सिंहाला मिठी मारण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र हा प्रयत्न त्याच्यावरच उलटला आहे. कारण भुकेल्या सिंहाने थेट त्याचा हात पकडला आहे. ही घटना सेनेगलमधील पार्क हेन प्राणीसंग्रहालयात घडल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ खूप जुना आहे, पण सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे.
सिंहाची डरकाळी ऐकून जंगलातील भयंकर प्राणीही थरथर कापतात, त्याच्यासह एका माणसाने मौजमजेच्या नादात जीव पणाला लावला. मात्र, सिंहाने मानवावर हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. नुकत्याच समोर आलेल्या व्हिडिओमध्ये, पिंजऱ्यात अडकलेल्या सिंहाने माणसाचा हात त्याच्या जबड्यात पकडल्याचे तुम्ही पाहू शकता. सिंहाने हात पकडल्यानंतर ती व्यक्ती जोरात किंचाळत आहे. या दरम्यान, तो हात काढण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो, परंतु अपयशी ठरतो. त्याचवेळी शेजारी उपस्थित असलेल्या काही लोकांनी दगडफेक करून सिंहाचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही सिंह हटत नाही.
हा व्हिडिओ अवघ्या काही सेकंदांचा आहे, मात्र तो पाहिल्यानंतर हृदयाचे ठोके वाढू शकतात. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की सिंह त्या व्यक्तीचा हात सोडण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्या व्यक्तीचे काय झाले माहीत नाही. पण एक मात्र नक्की की हा व्हिडीओ पाहिल्यानंतर क्वचितच कोणी अशी चूक करण्याचा विचार करेल. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर _geowild नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. पाच दिवसांपूर्वी अपलोड झालेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर दहशत निर्माण करत आहे. आतापर्यंत 10 लाखांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर काही लोक आश्चर्यचकित झाले असतानाच, अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युझरने खिल्ली उडवत लिहिले की, या धड्यानंतर आता ही व्यक्ती आयुष्यभर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करेल.