video : त्याने मिरचीच्या पाणीपुरी एकामागोमाग गटवल्या, पाहून कानातून येईल धूर
सोशल मिडीयावर कसला व्हिडीओ कधी प्रसिध्द होईल हे सांगू शकत नाही. आता एका फूड लव्हरने इस्टाग्रामवर मिरचीच्या पाणी पुरी खाण्याचा व्हिडीओ शेअर केला असून त्या व्हिडीओला पाहून तुम्हालाही घाम येईल...
मुंबई : सोशल मिडीयावर कसला टास्क किंवा नवा विक्रम कोणी करेल याचा काही नेम नाही. आता पाहा ना कोणी आंबे खाऊन नवा विक्रम करतो. तर कोणी आणखी काही पदार्थ खाऊन विक्रम नोंदवितो. आता गोलगप्पे म्हणजेच पाणी पुरी खाण्याची अनेकांना आवड असते. परंतू तुम्ही म्हणाल त्यात काय एवढा आलाय विक्रम. लोक तर आवडीने पंधरा ते वीस पाणी पुरी सहज संपवितात. परंतू एकाने अशा अनोख्या पाणी पुरीचा फडशा पाडला आहे की हा व्हिडीओ पाहून तुमच्या डोळे, नाकातून पाणी येईल आणि कानातून धुर येईल.
अनेकदा गोड व तिखट पाणी पाणी पुरीवर तावमारायला अनेकांना आवडते. तसेच अनेक जण तिखट जास्त टाकलेली पाणी पुरी खायाला एका पायावर तयार होतात. परंतू या पाणीपुरीत उकडलेले मुग किंवा वाटाणे नसून चक्क हिरव्यागार मिरच्या आहेत. आपण व्हिडीओमध्ये पाहाल की प्रत्येक पाणी पुरीत एक मोठी मिरची आहे. आणि तो तरुण आरामात एका मागोमाग एक पाणी पुरीत रेचवत आहे. तिखट मिरच्या तो असा काही खात आहे की जणू गोड गोड चॉकलेट संपवत आहे. अशा पद्धतीची पाणी पुरी तुम्ही कधीच पाहीली नसेल, आणि असा पाणी पुरीचा खवय्याही तुम्ही कधी पाहीला नसेल.
येथे पाहा व्हिडीओ…
View this post on Instagram
या व्हिडीओने सोशल मिडीयावर हल्लकल्लोळ माजविला आहे. या व्हिडीओला सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर खूपच पाहीले जात आहे. सोशल मिडीया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर bhuvieatingshow नावाच्या खात्यावरुन हा व्हिडीओ शेअर केला जात आहे. आतापर्यंत या व्हिडीओला सहा मिलियन म्हणजे 60 लाखाहून अधिक लोकांनी पाहीले आहे. तर 2 लाख 70 हजार लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. तसेच अनेक लोकांनी कमेट्स केल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की ही नॉर्मल मिरची आहे. तिखट नाही. जर तिखट असती तर हा बेशुध्द झाला असता. तर एका अन्य युजरने म्हटले की हा व्हिडीओ पाहून मीच दोन ग्लास पाणी पिले. तर एका युजरने म्हटले आहे की मस्करीच्या अंदाजात कमेंट केली आहे थांब आता उद्या सकाळी कळेल काय होईल ते.