Video | वाघांची तलावामध्ये पूल पार्टी सुरू असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल…
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका तलावात चार वाघ मस्ती करत बसले आहेत. असे दिसते की हे चौघे शिकारी करून थकलेले आहेत. अशा प्रकारे बसून आपल्या शरीराला ते आराम देत आहेत.
मुंबई : प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ (Video) दररोज सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतात. विशेष म्हणजे वापरकर्त्यांना देखील प्राण्यांचे व्हिडीओ प्रचंड आवडतात. कधीकधी वाघ (Tiger) जंगलात शिकार करताना दिसतात, तर अनेक वेळा ते त्यांच्या जागेसाठी इतर शिकारी प्राण्यांशी लढताना दिसतात. पण आता जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो थोडा वेगळा आणि खास आहे. कारण सध्या व्हायरल (Viral) होणाऱ्या व्हिडीओमध्ये वाघांचा एक कळप तलावामध्ये मजा करताना दिसतोयं.
इथे पाहा वाघांचा व्हायरल होणारा व्हिडीओ
Our tiger reserves are source of water to billions of Indian’s as many major river originates from them. Success of tiger conservation in India is key to our water & food security. Here a family of the big cat enjoying the onset of monsoons ?? (As received from a colleague) pic.twitter.com/cnIk5A8ud2
हे सुद्धा वाचा— Susanta Nanda IFS (@susantananda3) August 9, 2022
चार वाघांचा तलावामध्ये बसून मस्ती सुरू
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका तलावात चार वाघ मस्ती करत बसले आहेत. असे दिसते की हे चौघे शिकारी करून थकलेले आहेत. अशा प्रकारे बसून आपल्या शरीराला ते आराम देत आहेत. काही वेळानंतर मग या चाैघांपैकी एक वाघ उठून परत एकदा जंगलात जातो. मात्र, तीन वाघ बऱ्याच वेळ त्या तलावामध्ये विश्रांती करतात.
वन अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला व्हिडीओ
हा व्हिडिओ भारतीय वन अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे. 40 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून कमेंट देखील केल्या आहेत. एका यूजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की, पुढच्या लढाईपूर्वी ही विश्रांती आहे. तर दुसऱ्या यूजरने लिहिले, ही त्यांची पूल पार्टी खरोखरच छान आहे. दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘अल्कोहोलशिवाय पूल पार्टी मस्त आहे.
यूजरने दिल्या व्हिडिओवरती मजेदार कमेंट
वाघ हा जगातील सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे, ज्याला भारतात राष्ट्रीय प्राणी देखील म्हटले जाते. वाघांच्या अनेक प्रजाती असल्यातरी भारतात आढळणारी प्रजाती रॉयल बंगाल टायगर म्हणून ओळखली जाते. भारताव्यतिरिक्त नेपाळ, भूतान आणि बांगलादेशातही आढळतो. सध्या जगात वाघांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाल्याने नेहमीच चिंता व्यक्त केली जाते.