VIDEO : आता प्राण्यांनाही चढलाय फिटनेसचा फिव्हर, कुत्रा आणि मांजराचा हा मजेशीर व्हिडिओ पहाच !

हा व्हिडिओ आयएफएस अधिकारी सम्राट गौडा यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. सम्राट गौडा अनेकदा सोशल मीडियावर प्राण्यांचे मजेदार व्हिडिओ पोस्ट करतात.

VIDEO : आता प्राण्यांनाही चढलाय फिटनेसचा फिव्हर, कुत्रा आणि मांजराचा हा मजेशीर व्हिडिओ पहाच !
आता प्राण्यांनाही चढलाय फिटनेसचा फिव्हरImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Oct 22, 2022 | 8:06 PM

रोजचे धावपळीचे आयुष्य, वारंवार उद्भवणाऱ्या तब्येतीच्या तक्रारी यामुळे आजकाल प्रत्येक जण फिटनेसच्या बाबतीत अधित जागृक झाला आहे. याशिवाय महिलांमध्ये सडपातळ दिसण्याकडे आणि पुरुषांमध्ये बॉडी बिल्डर बनण्याकडे कल अधिक वाढला आहे. मात्र केवळ माणसंच नाही तर प्राणीही आता फिटनेस प्रेमी (Fitness Lover) झाल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral on Social Media) होत असलेल्या व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा होत आहे. कुत्रा आणि मांजराचा वॉक (Dog and Cat Walk on Treadmill) करतानाचा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांनाच भुरळ घालत आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक कुत्रा आणि एक मांजर ट्रेडमिलवर चालताना दिसत आहे. प्राणी नैसर्गिकरित्याच फिट असतात. मात्र या व्हिडिओत वेगळेच चित्र दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

हा व्हिडिओ आयएफएस अधिकारी सम्राट गौडा यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. सम्राट गौडा अनेकदा सोशल मीडियावर प्राण्यांचे मजेदार व्हिडिओ पोस्ट करतात. नुकताच कुत्रा आणि मांजराचा शेअर केलेला हा व्हिडिओ लोकांना खूप आवडत आहे.

कुत्रा ट्रेडमिलवर आरामात चालताना दिसतोय

व्हिडिओमध्ये ट्रेडमिलवर कुत्रा आरामात चालताना दिसत आहे. मात्र मांजर त्यावरुन खाली पडत असून पुन्हा चालण्याचा प्रयत्न करत आहे. पण तिला ट्रेडमिलवर चढता येत नाही.

व्हिडिओत कुत्र्याचे हावभाव पाहून असे वाटते, जणू काही कुत्रा मांजराला ट्रेडमिलवर कसे चालवायचे हे शिकवत आहे. पण मांजर शिकू शकत नाही. मांजर वारंवार अडखळते आणि खाली पडते.

ती एक-दोनदा कुत्र्याचा पाय पकडते, मात्र तरीही ती चढू शकत नाही आणि खाली बसते. शेवटी, ती प्रयत्न करते आणि आधी पुढचे दोन्ही पाय वर करून आणि नंतर मागचे दोन्ही पाय वर करून ट्रेडमिलवर चढते आणि चालायला लागते.

सोशल मीडियावर व्हिडिओला पसंती

सोशल मीडियावर या व्हिडिओला अधिक पसंती मिळाली आहे. या व्हिडिओला 1500 व्ह्यूज मिळाले असून अनेक कमेंट्सही मिळाल्या आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.