Video : डॉलीनंतर सुरतच्या चहावाल्याचा व्हिडीओ तूफान व्हायरल, हातात माईक आणि हे गाणे…
डॉली चहावाला हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. डॉली चहावाला याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. डॉली चहावालाचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. अगदी कमी कालावधीमध्ये एक वेगळी ओळख ही नक्कीच डॉली चहावाला याने मिळवली आहे.
डॉली चहावाला देशभर प्रसिद्ध झाला. अगदी कमी दिवसांमध्ये डॉली चहावाला याला एक वेगळीच ओळख मिळाली. फक्त देशच नाहीतर विदेशातही डॉली चहावाला प्रसिद्ध आहे. अब्जाधीश अन् मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मालक बिल गेट्स यांनी देखील डॉली चहावालाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. खास डॉली चहावालाचा चहा पिण्यासाठी देखील त्याच्या टपरीवर बिल गेट्स पोहोचले होते. फक्त बिल गेट्स हेच नाहीतर डॉली चहावालाचा चहा पिण्यासाठी लोक दूरवरून कायमच येतात. डॉली चहावाला हा काही दिवसांपूर्वीच विदेशात फिरायला गेला होता.
आता डॉली चहावाला याच्यानंतर अजून एका चहावाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये तो चहावाला सुंदर गाणे म्हणताना दिसतोय. शिवाय गाणे म्हणत म्हणत तो चहा बनवताना दिसतोय. सोबतच या चहावाल्याचे गाणे ऐकत लोक मस्त चहाचा आनंद घेताना देखील दिसत आहेत. आता हाच व्हिडीओ व्हायरल होत आहे.
सिंगिंग चहावाला अशी या चहावाल्याची ओळख आहे. या व्हिडीओमध्ये तो चहावाला चिंगारी कोई भडके हे गाणे गाताना दिसतोय. हा व्हिडीओ शेअर करत लिहिण्यात आले की, सूरतचे विजयभाई पटेल हे गेल्या कित्येक वर्षांपासून चहा विकत आहेत. चहा पिण्यासाठी आणि त्यांचे गाणे ऐकण्यासाठी लोक दूर दूर वरून येतात.
View this post on Instagram
सिंगिंग चहावाला यांच्या या व्हिडीओला 5.43 लाख व्यूज मिळाले आहेत. विशेष म्हणजे 14 हजारांपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ देखील बघितला आहे. हा व्हिडीओ विरल भयानीने सोशल मीडियावर शेअर केलाय. हा व्हिडीओ लोकांना चांगलाच आवडताना देखील दिसत आहे. लोक या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत.
विशेष म्हणजे या चहावाल्याचा आवाज खूप जास्त सुंदर दिसतोय. एकीकडे हातामध्ये माईक घेऊन गाणे म्हणताना हा चहावाला दिसत आहे तर दुसरीकडे तो चहा तयार करत आहे. अनेकांनी कमेंट करत म्हटले की, याचा आवाज डॉली चहावालापेक्षाही खूप जास्त चांगला आहे. दुसऱ्याने लिहिले की, मी लवकरच या चहावाल्याचे गाणे ऐकण्यासाठी जाणार आहे.