Viral Video: “एक दिवस माणसाला आकाशात फिरताना अचानक गिधाड भेटलं…”कसं वाटतंय वाचून? व्हिडीओ तर अजून मस्तंय बघा…

पॉल नेल्सन या ट्विटर युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या तरी या व्हिडिओतील लोकेशन समोर आलेलं नाही. कमेंट बॉक्समध्ये एका ट्विटर युजरने स्पष्ट केलं की, प्रत्यक्षात हा 'पॅराहावकिंग' नावाचा एक प्रकार आहे.

Viral Video: एक दिवस  माणसाला आकाशात फिरताना अचानक गिधाड भेटलं...कसं वाटतंय वाचून? व्हिडीओ तर अजून मस्तंय बघा...
पॅराग्लायडिंग करताना अचानक एक गिधाड आलेImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 4:55 PM

तुम्ही कधी पॅराग्लायडिंग (Paragliding) केलंय का? त्याहीपेक्षा तुम्ही कधी पक्षासोबत पॅराग्लायडिंग केलंय का? हा व्हिडीओ प्रचंड वायरल (Viral Video) झालाय यात एक पक्षी आणि माणूस सोबत पॅराग्लायडिंग करतायत. काळ्या गिधाडासोबत पॅराग्लायडिंग करणाऱ्या एका व्यक्तीच्या व्हिडीओमुळे इंटरनेटवर खळबळ उडाली आहे. ही छोटी क्लिप आतापर्यंत 15.4 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिली गेली आहे. व्हिडिओत हे गिधाड (Vulture) हजारो फूट उंचीवर पॅराग्लायडरसह शांतपणे उडताना दिसत आहे. खाली हिरवीगार जंगले आणि इमारती दिसतात. पक्षी आपल्या शरीराच्या मागील बाजूस वर-खाली आणि उजवी-डावीकडे फिरवून हवेत आपले उड्डाण करतानाही दिसतो.

पॅराग्लायडिंग करताना अचानक एक गिधाड आले

काही सेकंदाच्या क्लिपमध्ये पॅराग्लायडरच्या पायाशी जाऊन बसलेले महाकाय गिधाडही दिसते, तर माणूस त्याला कुरवाळू लागतो. फुटेजच्या शेवटी काळा गिधाड ग्लायडरचे बूट खाताना दिसत आहे. पॉल नेल्सन या ट्विटर युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या तरी या व्हिडिओतील लोकेशन समोर आलेलं नाही. कमेंट बॉक्समध्ये एका ट्विटर युजरने स्पष्ट केलं की, प्रत्यक्षात हा ‘पॅराहावकिंग’ नावाचा एक प्रकार आहे, ज्यात गिधाडासोबत पॅराग्लायडिंगचा समावेश आहे. दुसऱ्या वापरकर्त्याने सांगितले की, पक्ष्यांना पॅराग्लायडर्ससह प्रवास करण्याचे प्रशिक्षण दिले जाते.

हे सुद्धा वाचा

व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या

हा सीन पाहून इतर युझर्स आश्चर्यचकित झाले. कमेंट बॉक्समध्ये लिहिले होते, “जादूई. पीक लाइफ . यापेक्षा चांगला अनुभव कधीच असू शकत नाही.” व्हिडिओ पाहिल्यानंतर आणखी एका युझरने लिहिले की, “आयुष्यात एकदाच आलेला हा इव्हेंट आहे. हे आश्चर्यकारक आहे.” एका वापरकर्त्याने विनोद केला, “मला खात्री आहे की पक्षी तेथे आपली शिकार शोधत आहे. हे किती वेळा घडतं माहीत नाही, पण ते अनुभवताना किती बरं वाटतं.” काही काळापूर्वी आणखी एका पक्ष्याचा हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एका महिलेचा पिझ्झा हवेत उडवण्यात आला होता. या क्लिपमुळे इंटरनेट युजर्सना आश्चर्याचा धक्का बसला.

पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला.
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्..
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्...