Video : रेल्वे स्टेशनवर काकूबाईंचा डान्स, मागे उभी असलेली माणसंही नाचू लागली!, व्हीडिओ पाहून दिवाने व्हाल!
एक डान्सचा व्हीडिओ सध्या अनेकांच्या पसंतीला उतरतोय. या व्हीडिओमध्ये एक महिला रेल्वे स्टेशनवर डान्स करताना दिसत आहे. बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या गाण्यावर ही महिला डान्स करताना पाहायला मिळत आहे.
मुंबई : सध्या सोशल मीडिया (Social media) बरेच व्हीडिओ पाहायला मिळतात. यातले डान्सचे व्हीडिओ सध्या जास्त पसंत केले जातात. डान्सचे हे काही व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल (viral video) होतात. असाच एक डान्सचा व्हीडिओ सध्या अनेकांच्या पसंतीला उतरतोय. या व्हीडिओमध्ये एक महिला रेल्वे स्टेशनवर डान्स करताना दिसत आहे. बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या गाण्यावर ही महिला डान्स करताना पाहायला मिळत आहे. या व्हीडिओला लाखो लोकांनी पाहिलंय. तर साडे सहा लाख लोकांनी याला लाईक केलंय.
व्हायरल व्हीडिओ
एक डान्सचा व्हीडिओ सध्या अनेकांच्या पसंतीला उतरतोय. या व्हीडिओमध्ये एक महिला रेल्वे स्टेशनवर डान्स करताना दिसत आहे. बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या गाण्यावर ही महिला डान्स करताना पाहायला मिळत आहे. तिचा हा डान्स पाहून तिच्या मागे उभे असलेले दोन तरूणही नाचू लागतात. तिच्या स्टेपला फॉलो करताना पाहायला मिळतात. हा व्हीडिओ Nitu Mehna या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हीडिओला लाखो लोकांनी पाहिलंय. तर साडे सहा लाख लोकांनी याला लाईक केलंय.
View this post on Instagram
या महिलेने याआधीही तिच्या डान्सचे व्हीडिओ शेअर केले आहेत. यात ती एका महिलेसोबत डान्स करताना पाहायला मिळत आहे. तिच्या या व्हीडिओलाही हजारो लोकांनी पाहिलंय. तसंच सोळा हजारांहून अधिक लोकांनी लाईकही केलंय.
View this post on Instagram
याआधीही अश्याच एका काकूबाईंचा डान्स पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले होते. तिचा हा खूप जास्त व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर कच्चा बदाम या बंगाली गाण्याची मोठ्या प्रमाणावर क्रेझ पाहायला मिळतेय. सामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत आता परदेशातही लोक रील्स बनवून हे गाणे शेअर करत आहेत. हे गाणं भुबन बड्याकर तर रातोरात स्टार झाला. सध्या कच्चा बदाम या गाण्यावरचा एका काकूबाईंचा डान्स व्हायरल झाला. हा व्हीडिओ पाहून अनेकांना हसू आवरत नाहीये. या व्हीडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे. ज्यात एक महिला तल्लीन होऊन डान्स करत आहे.
View this post on Instagram