Video: सिंहाच्या पिंजऱ्याच्या दगडावर जाऊन बसला, सिंह पकडणार तोच…पाहा हादरवणारा व्हिडीओ!
31 वर्षांचा युवक ज्याचं नाव साई कुमार सांगितलं जात आहे, तो सिंहाच्या पिंजऱ्याभोवती लावलेल्या दगडींवर जाऊन बसला. या तरुण जिथं बसला होता, तिथंच आफ्रिकन सिंहाची गुफा आहे
हैदराबाद: कधी कधी मानसिक संतुलन बिघडलेले लोक काय करतील सांगता येत नाही. अशाच एका घटनेत, एका युवकाचे प्राण जाता जाता वाचले. हैदराबादच्या नेहरु झुलॉजिकल पार्कमध्ये ही मोठी दुर्घटना होणार होती, पण प्राणी संग्रहालय कर्मचाऱ्यांच्या सजगतेमुळे ती झाली नाही. 23 नोव्हेंबर म्हणजेच मंगळवारी एक युवक अचानक सिंहाच्या कुंपणाजवळील दगडावर जाऊन बसला. नशिबाने या युवकाला वेळीच कर्मचाऱ्यांनी पाहिलं, आणि त्याला खाली उतरवून पोलिसांच्या ताब्यात दिलं. या घटनेचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये सिंह या युवकाला पकडण्याच्या तयारीतच असल्याचं दिसतं आहे. (A young man enters a lion’s cage at Hyderabad zoo, staff rescues him)
नेमकं काय घडलं?
मंगळवार, 23 नोव्हेंबरच्या दुपारी 3.30 वाजे दरम्यानची गोष्ट. 31 वर्षांचा युवक ज्याचं नाव साई कुमार सांगितलं जात आहे, तो सिंहाच्या पिंजऱ्याभोवती लावलेल्या दगडींवर जाऊन बसला. या तरुण जिथं बसला होता, तिथंच आफ्रिकन सिंहाची गुफा आहे, कुठल्याही पर्यटकाला इथं जाण्यास बंदी आहे. मात्र हा युवक रेलिंग पार करुन इथं पोहचला. त्यानंतर या तरुणाने या पिंजऱ्यात उडी मारण्याचा प्रयत्न केला, पण दगडपासून हा पिंजरा खोलीवर असल्याने अंदाज घेण्यासाठी त्याचा वेळ गेला. हे सगळं पाहणारे पर्यटकांची आरडाओरड सुरु झाली, त्यानंतर प्राणी संग्रहालयाचे कर्मचारी सिंहाच्या पिंजऱ्याजवळ पोहचले, आणि या युवकाला पकडून हैदराबाद पोलिसांच्या ताब्यात दिलं.
व्हिडीओ पाहा:
A man was enters into the #Lion enclosure, walking on the boulders of #AfricanLion moat area, at #NehruZoologicalPark, #Hyderabad.
The person was rescued and caught by the #zoo staff and handed over to Bahadurpura police. pic.twitter.com/RO3TW2fh3G
— Surya Reddy (@jsuryareddy67) November 23, 2021
हा तरुण किसरा भागातील रहिवासी असून तो मानसिक रुग्ण आहे. दरम्यान असंच एक प्रकरण 2016 मध्येही समोर आलं होतं, जिथं एका तरुणाला सिंहासोबत शेकहँड करायचा होता. त्यासाठी तो थेट सिंहांच्या पिंजऱ्यात पोहचला, पण ही गोष्ट वेळीच लक्षात आल्यानंतर प्राणी संग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांनी या तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. या व्यक्तीला आर्थिक दंडासह 4 महिन्याचा कारवासाची शिक्षा झाली.
नवी दिल्लीही सिंहासमोर जाण्याचा प्रयत्न
2019 ची घटना, दिल्लीच्या प्राणीसंग्रहालयात एक तरुण सिंहाच्या पिंजऱ्यात शिरला होता. हेच नाही या महाशयांनी सिंहासोबत सेल्फीही घेतला, नशिबाने प्राणी संग्रहालयाचे कर्मचारी तिथं दाखल झाले आणि त्यांनी या सनकी तरुणाला पकडलं. या प्रकरणातही या तरुण मानसिक रुग्ण असल्याचं समोर आलं होतं.
2014 मध्ये सिंहाने तरुणाला संपवलं
2014 मध्ये दिल्लीच्याच प्राणी संग्रहालयात पांढऱ्या वाघांच्या पिंजऱ्या 20 वर्षांचा युवक शिरला, वाघांसाठी बनवलेल्या 18 फूट खोल खड्ड्यात त्याने उडी मारली. त्यानंतर तो वाघांसमोर जाऊन हात जोडून बसला. 15 मिनिटांपर्यंत हा खेळ सुरु राहिला, त्यानंतर बाहेरचे लोक आरडाओरडा करु लागले, वाघाला दगडं मारु लागले, त्यानंतर त्यातील एक वाघ चिडला आणि या युवकाचे प्राण घेतले.
हेही पाहा: