AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mirzapur 2 | रॉबिनच्या तोंडी गाजलेला ‘ये भी ठीक है’ आला कुठून? खुद्द प्रियांशूने सांगितला किस्सा

रॉबिनच्या गूढ व्यक्तिरेखेला वजन देण्यासाठी प्रियांशू पैन्युलीने (Priyanshu Painyuli) एखादा तकियाकलाम (Ye bhi thik Hai) जोडण्याचं ठरवलं

Mirzapur 2 | रॉबिनच्या तोंडी गाजलेला 'ये भी ठीक है' आला कुठून? खुद्द प्रियांशूने सांगितला किस्सा
Follow us
| Updated on: Jan 02, 2021 | 8:34 AM

मुंबई : ‘नेटफ्लिक्स’वर गाजलेल्या ‘एक्स्ट्रॅक्शन’ (Netflix film Extraction) सिनेमातील क्राईम लॉर्ड ते अॅमेझॉन प्राईमवरील मिर्झापूरच्या दुसऱ्या भागातील (Amazon Prime Video’s Mirzapur 2) रॉबिन… अभिनेता प्रियांशू पैन्युली (Priyanshu Painyuli) याने अल्पावधीतच ओटीटी प्लॅटफॉर्मवर ओळख मिळवली आहे. ‘चलो, ये भी ठीक है’ हा डायलॉग रॉबिनच्या तोंडी प्रचंड गाजला होता. गर्लफ्रेण्ड वंदना जोशीसोबत तो नुकताच विवाहबंधनात अडकला. त्यानिमित्त गप्पा मारताना खुद्द प्रियांशूनेच या डायलॉगची जन्मकथा सांगितली. (Actor Priyanshu Painyuli Hit Dialogue Chalo Ye bhi thik Hai in Amazon Prime Video Mirzapur 2)

रिव्हर राफ्टिंगवाल्या काकांची देण

रॉबिन ही व्यक्तिरेखा व्यवस्थित कागदावर उतरलेली होती. मात्र या भूमिकेभोवती काहीसे गूढ वलय होते. त्यामुळे एखादे वाक्य (तकियाकलाम) त्याच्या तोंडी द्यावे, असं मला वाटलं. काही वर्षांपूर्वी मी मित्रांसोबत रिव्हर राफ्टिंगला गेलो होते. आमच्या कॅम्पिंगची व्यवस्था एक गृहस्थ पाहत होते. त्यांच्या तोंडी सारखे ‘चलो, ये भी ठीक है’ हे वाक्य असायचे. हे वाक्य म्हटल्यानंतर ते एक धीरगंभीर पॉझ घ्यायचे. तेव्हापासूनच ते माझ्या डोक्यात फिट बसलं होतं. मिर्झापूरसाठी माझं अॅडिशन म्हणून एका सीनमध्ये मी हा डायलॉग वापरायचं ठरवलं. हेतू हाच होता, की रॉबिनच्या गूढ व्यक्तिरेखेला वजन देणं. सुदैवाने त्या जागी ते चपखल बसलं. त्यामुळे मी ठरवलं, की हे वाक्य जागोजागी वापरायचं, वेगवेगळ्या इमोशन्सना चिकटवायचं, असं प्रियांशू सांगतो.

रॉबिनची मम्मीही लोकप्रिय

‘ये भी ठीक है’ हे वाक्य 2020 चं स्लोगन म्हणून लोक वापरत असल्याचं पाहून मीही आश्चर्यचकित झालो. चाहत्यांमध्ये हा डायलॉग इतका लोकप्रिय होईल, असं मला कधीही वाटलं नव्हतं. मिर्झापूरच्या अंधाऱ्या जगात रॉबिनसारख्या रंगीबेरंगी भूमिकेची अपेक्षाच नव्हती. सर्व गोष्टींमध्ये तो स्वतःच्या ‘मम्मी’चा अँगल आणायचा, हे मला आवडलं. रॉबिनच्या आईबद्दलचे रहस्य सीझन 3 मध्ये उघड केले जाईल, अशी आशा प्रियांशूने व्यक्त केली.

2020 हे वर्ष माझ्यासाठी वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्ट्या खूप वेगळं होतं. ते संमिश्र भावनांचं वर्ष होतं. सुरुवातीला काही फिल्म्स रिलीज झाल्या, नंतर हे पॅनडेमिक आलं. त्यामुळे भविष्यात काय वाढून ठेवलं आहे, हा प्रश्न उद्भवला होता. अर्थात बरेच जण यातून तावून सुलाखून निघाले आहेत आणि त्यांनी सकारात्मक दृष्टीने या वर्षाकडे पाहिले आहे. हे वर्ष माझ्यासाठी रोलर-कोस्टर राईडचे अधिक होते, असं प्रियांशू सांगतो.

वंदनाशी गाठभेट कशी झाली

वंदनाला मी लग्नासाठी प्रपोज केलं. 2013 मध्ये वैभवी मर्चंटच्या ताज एक्स्प्रेसमध्ये सहकलाकार म्हणून आम्ही भेटलो. श्रुती मर्चंट दिग्दर्शित हा एक बॉलिवूड ब्रॉडवेचा प्रकार होता. आम्ही जगभरात सुमारे 120 कार्यक्रम केले. आम्ही मित्र झालो आणि तेव्हापासून एकत्र होतो. आम्हाला दोघांनाही प्रवासाची आवड आहे आणि आम्हाला आयुष्याचा प्रवासही सोबत करायचा आहे, अशी छोटीशी लव्हस्टोरी प्रियांशूने सांगितली. (Actor Priyanshu Painyuli Hit Dialogue Chalo Ye bhi thik Hai in Amazon Prime Video Mirzapur 2)

संबंधित बातम्या :

वादाच्या भोवऱ्यात अडकूनही ‘आश्रम’ सीरीज परत एकदा करणार धमाका?

अमिताभ बच्चन यांनी सोनू सूदचे स्वप्न केले पूर्ण, पहा नेमके काय घडले ते…

(Actor Priyanshu Painyuli Hit Dialogue Chalo Ye bhi thik Hai in Amazon Prime Video Mirzapur 2)

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत.
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'.
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली.
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्....
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.