VIDEO: करवा चौथसाठीची डाबरची जाहिरात वादात, लेस्बियन नात्याचा उल्लेख, वादानंतर डाबरकडून माफी!
करवा चौथच्या दिवशीच डाबर कंपनीने एक व्हिडिओ जारी केला, ज्यामध्ये एक लेस्बियन जोडपे करवा चौथ साजरे करताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे अनेकजण संतापले
देशभरात रविवारी करवा चौथचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. यानिमित्त विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत दिवसभर उपवास करतात. करवा चौथच्या दिवशीच डाबर कंपनीने एक व्हिडिओ जारी केला, ज्यामध्ये एक लेस्बियन जोडपे करवा चौथ साजरे करताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे अनेकजण संतापले आहेत. (Advertisement of Dabur made on the occasion of Karwa Chauth in controversy. The ad mentions lesbian relationships, an apology from Dabur)
22 ऑक्टोबर रोजी लाँच झालेल्या या जाहिरातीत दोन महिला त्यांच्या पहिल्या करवा चौथची तयारी करत आहेत. ते एकमेकांच्या चेहऱ्यावर ब्लीच लावतात. या व्हिडिओमध्ये ते सणाचे महत्त्व सांगत आहेत आणि त्या एकमेकींसाठी उपवास का करतात याबद्दल बोलतात.
व्हिडीओ पाहा:
Well done, Fem/Dabur!
A nice film for a traditional, often-criticized festival by an otherwise conservative brand. pic.twitter.com/gHBTca6jP8
— Abhishek Baxi (@baxiabhishek) October 22, 2021
क्लिपच्या शेवटी दोन्ही महिलांनी एकमेकांसाठी उपवास केल्याचे समोर येतं. कारण ते चंद्राकडे पाहतात आणि नंतर चाळणीतून एकमेकींकडे पाहतात आणि करवा चौथचा उपवास सोडतात.
‘ग्लो विथ प्राइड’ या हॅशटॅगसह इंद्रधनुष्याच्या रंगात चित्रित केलेल्या डाबरच्या ब्युटी ब्रँड फेमच्या लोकांसह क्लिपचा शेवट होतो. इंद्रधनुष्य ध्वज LGBTQIA+ सामाजिक चळवळीचे प्रतीक आहे.
डाबरकडून अखेर माफी:
— Dabur India Ltd (@DaburIndia) October 24, 2021
हा व्हिडीओ ऑनलाइन शेअर केल्यानंतर त्याला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. काहींनी ब्रँडच्या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे, तर काहीजण त्यावर टीका करत आहेत. काहींनी याला हिंदू संस्कारांशी खेळणे म्हणत विरोध केला. त्याच वेळी, LGBTQ चे समर्थन करणाऱ्यांनी पितृसत्ता LGBTQ शी जोडल्याबद्दल टीका केली. यानंतर डाबरने ट्विट करून व्हिडिओबद्दल खेद व्यक्त केला.
हेही पाहा:
Video: चपाती-भाजीला नो-नो, चिमुकल्याला हवा फक्त केक, डिमांडिंग चिमुरड्याचा व्हिडीओ व्हायरल
Video: गाडीतून उतरला आणि थेट 11 वाघांच्या कळपात गेला, पुढं जे झालं त्याने नेटकरी आवाक, चीनमधला व्हिडीओ व्हायरल