Marriage | 15 वर्षांची प्रतीक्षा, 10 वेळा नकार, अखेर 3.7 फुटाच्या माणसाला मिळाली इतक्या फूट उंचीची बायको

Marriage | लग्नाच्या जोड्या स्वर्गात जुळतात असं म्हणतात. पण काहीवेळा लग्न जुळवताना खूप नाकीनऊ येतात. काही लग्न सहज जुळून जातात. पण काही लग्न जुळता जुळत नाहीत. अर्शदला अनेकदा नकार पचवावा लागला. आज आम्ही तुम्हाला अशाच एक लग्नाची गोष्ट सांगणार आहोत.

Marriage | 15 वर्षांची प्रतीक्षा, 10 वेळा नकार, अखेर 3.7 फुटाच्या माणसाला मिळाली इतक्या फूट उंचीची बायको
Married Man
Follow us
| Updated on: Feb 15, 2024 | 12:05 PM

लखनऊ : कधी कधी काही लग्न सहज जुळून जातात. पण काही लग्न जुळता जुळत नाहीत. अनेक वर्ष त्यात निघून जातात. काही कमतरता नसतानाही समोरुन नकार पचवावा लागतो. मोहम्मद अर्शदची सुद्धा अशीच स्थिती होती. मोहम्मद अर्शदच लग्न जुळत नव्हतं, त्याला कारण होतं उंची. लग्नासाठी त्याने 15 वर्ष वाट पाहिली. 35 वर्षाच्या अर्शदला अनेकदा नकार पचवावा लागला. अखेर त्याला त्याच्या आयुष्याची जोडीदार सापडली. अर्शद उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरातील स्याना भागात राहतो.

“मी माझ्या उंचीवरुन लोकांच्या बऱ्याच गोष्टी ऐकायचो. माझ लग्न होईल की, नाही? ही भीती माझ्या मनात होती” असं अर्शदने सांगितलं. अर्शदने लग्नासाठी प्रयत्न केले. पण त्याला 10 ठिकाणहून लग्नासाठी नकार पचवावा लागला. अखेर नियतीच्या मनात होतं, त्याला जोडीदार मिळाली. “लोक माझ्या उंचीवरुन कमेंट करायचे. पण चांगला जोडीदार मिळेल ही अपेक्षा मी शेवटपर्यंत सोडली नाही. अखेर माझी प्रतिक्षा फळाला आली” असं अर्शद म्हणाला. त्याचा फर्निचरचा व्यवसाय आहे.

पत्नीची उंची किती?

मॅट्रीमोनियल साइटवर नाव नोंदवूनही फायदा झाला नाही. “चार महिन्यापूर्वी मला माझ्या नातेवाईकांनी एका मुलीबद्दल सांगितलं. ती सुद्धा उंचीने छोटी होती. माझ्या उंचीमुळे तिच्या कुटुंबाने मला रिजेक्ट केलं होतं. पण आमच्या नातेवाईकांच्या हस्तक्षेपामुळे हे लग्न झालं” असं अर्शद म्हणाला. अर्शदच्या पत्नीच नाव सोना असून ती 4 फूट उंचीची आहे.

अर्शदचा मित्र फिरोझ मलिक म्हणाला की, “त्याला योग्य जोडीदार मिळावा ही माझी नेहमीच इच्छा होती. मला लग्नाच निमंत्रण मिळालं, तेव्हा खूप आनंद झाला. मी आनंदाने नातेवाईक आणि मित्र परिवाराला मिठाई वाटली”

...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.