IAS, IFS, IPS शाळेत पोहचले, अधिकाऱ्यांना शिक्षिकेने मारली छडी! मजेशीर व्हिडीओ व्हायरल
शाळेचे दिवस खूप मजेशीर असतात. आपल्याला सुद्धा शाळेचे दिवस आठवले की आपण गहिवरून जातो. IAS, IFS, IPS अधिकारी सुद्धा आपल्यासारखेच सामान्य माणसं असतात. त्यांना देखील शाळेची आठवण येत असेलच. असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यात IAS, IFS, IPS अधिकारी आपल्या शाळेतील एका शिक्षिकेला भेटायला जातात. पुढे काय होतं बघा...हा व्हिडीओ भावुक करणारा आहे.
मुंबई: शाळेचे दिवस हे आपल्या आयुष्यातील सर्वात आनंदाचे दिवस असतात. चांगले मित्र आणि शाळेचे दिवस वर्षानुवर्षे लोकांच्या स्मरणात राहतात. लहानपणी शाळेत मजा केल्याचे तुम्हालाही नेहमी आठवत असेल. जुने मित्र जेव्हा भेटतात तेव्हा त्यांना जुने दिवस नक्की आठवतात. शाळेतील सर्वोत्कृष्ट शिक्षक लोकांना नेहमी आठवतात आणि जेव्हा ते मोठे होतात आणि पुन्हा आपल्या शिक्षकांना भेटतात तेव्हा त्यांना जुने दिवस नक्कीच आठवतात. सगळ्यांनाच लहानपणी क्लासमध्ये केलेली मजा आठवते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये अनेक मित्र अधिकारी म्हणून त्यांच्या शाळेत पोहोचतात.
तेच बेंच, तेच पाण्याचे नळ, तेच क्लासेस
वेळ कशी निघून जाते कळत नाही. शाळा संपते, लोकं कॉलेजला जातात. कॉलेज संपतं, नोकरी करू लागतात. आयुष्य पुढे जातं लोक नोकरीत व्यस्त होतात आणि हे चक्र चालूच राहतात. आपल्या शाळेतील मित्र आणि शिक्षकांना भेटणे ही जगातील सर्वात सुंदर भावना असू शकते. तेच बेंच, तेच पाण्याचे नळ, तेच क्लासेस आणि आपल्या आवडत्या शिक्षकांनी आपल्याला एकेकाळी शिकवलेल्या गोष्टी अशा गोष्टी आठवून मन अगदी प्रसन्न होतं. असेच काहीसे या IAS, IFS आणि IPS अधिकाऱ्यांच्या बाबतीत घडले जेव्हा ते त्यांच्या आवडत्या शिक्षकाला भेटले.
All are IAS, IFS and IPS officers, came to meet their school time strict teacher. What a memorable and heart touching moment pic.twitter.com/kvX6K3pXdQ
— Harsha Patel 🇮🇳 (@harshagujaratan) August 17, 2023
सोशल मीडिया युजर्स जुन्या आठवणींमध्ये हरवले
हे अधिकारी आणि त्यांचे आवडते शिक्षक यांच्यातील हृदयस्पर्शी क्षण सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालतायत. सर्व अधिकारी त्यांच्या एकदम कडक बाईंना भेटतात. शिक्षिका सुद्धा आपल्या आपल्या विद्यार्थ्यांना काठीने मारते. ऑनलाइन शेअर झाल्यापासून हा व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होत असून सोशल मीडिया युजर्स जुन्या आठवणींमध्ये हरवले आहेत. हर्षा पटेल यांनी हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, ‘सर्व आयएएस, आयएफएस आणि आयपीएस अधिकारी त्यांच्या शाळेतील कडक शिक्षकांना भेटण्यासाठी आले होते. किती अविस्मरणीय आणि हृदयस्पर्शी क्षण आहे.”