ओsss शेठ नंतर ओsss सर, छोटा मुलगा म्हणतो ‘आठवण तुमची लय हो आली,’ व्हायरल गाण्याची धूम

सध्या मात्र ओ शेठ या गाण्याच्या तालावर एका छोट्या मुलाचे मराठी गाणे चांगलेच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये छोटा मुलाला कोरोनामुळे शाळा बंद झाल्यामुळे आपल्या शिक्षकांची चांगलीच आठवण झाली आहे.

ओsss शेठ नंतर ओsss सर, छोटा मुलगा म्हणतो 'आठवण तुमची लय हो आली,' व्हायरल गाण्याची धूम
o shet o sir
Follow us
| Updated on: Sep 04, 2021 | 10:54 PM

मुंबई : गायक उमेश गवळी यांच्या आवाजातील ‘ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट…’ या गाण्याने महाराष्ट्राला अक्षरश: वेड लावलं. या गाण्याला आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी पाहिले आहे. एवढंच नाही, तर लग्न समारंभ किंवा इतर कार्यक्रमात लोक या गाण्यावर हमखास थिरकत आहेत. सध्या मात्र ओ शेठ या गाण्याच्या तालावर एका छोट्या मुलाचे दुसरे मराठी गाणे चांगलेच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील छोट्या मुलाला कोरोनामुळे शाळा बंद झाल्यामुळे आपल्या शिक्षकांची चांगलीच आठवण झाली आहे. हा छोटासा मुलगा ‘ओ सर नाही पडणार तुमचा विसर’ हे गाणं गाताना दिसतोय. (after o sheth marathi song small boy o sir marathi new song went viral on social media)

ओ शेठच्या धर्तीवर ओ सर….

ओ शेठ या गाण्याला उमेश गवळी गायलं असून संध्या आणि प्रणिकेत यांनी त्याला लिहलेलं आहे. या या गाण्याची रेकॉर्डिंग केल्यानंतर त्याला एवढी प्रसिद्धी मिळेल याची कल्पना कोणालाही नव्हती. मात्र, या गाण्याला युट्यूब तसेच इतर माध्यमांवर कोटीच्या संख्येने पाहिले गेले. या गाण्याला महाराष्ट्राने अक्षरश: डोक्यावर घेतले. याच गाण्याच्या तालावर आता एका छोट्या मुलाचे मजेदार गाणे व्हायरल होत आहे. या गण्यात कोरोनामुळे शाळा बंद झाल्या आहेत. ऑनलाईन शिकवणी सुरु आहे. मात्र, ऑनलाईन शाळा भरत असल्यामुळे मला माझ्या सरांची खूप आठवण येत आहे, असे व्हिडीओतील छोटा मुलगा म्हणताना दिसतोय.

व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

“कोरोनानं शाळा बंद हो झाली

आठवण तुमची लय हो आली

ओsss सर

नाही पडणार तुमचा विसर

ओ sss सर

आमच्यावर आहे तुमचा विसर”

असे हा छोटा मुलगा अगदी मजेदार पद्धतीने म्हणताना दिसत आहे. हा व्डिडीओ नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे. लोक या व्हिडीओला पाहून मजेदार कमेंट्स करत आहेत. तसेच या व्हिडीओ उत्स्फूर्तपणे शेअर करत आहेत. व्हायरल होत असलेला हा नवा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला फेसबुकवर ‘आईच्या गावात अन 12 च्या भावात’ या मराठी पेजवर अपलोड करण्यात आले आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे.

पाहा व्हिडीओ :

इतर बातम्या :

Video | तरुणीचा तरुणासोबत स्टंट, पण मध्येच घडला विचित्र प्रकार, पाहा व्हिडीओ

Video | लबाड कावळ्याचा चक्रावून सोडणारा कारनामा, चक्क पैशांची करतो चोरी, व्हिडीओ व्हायरल

Video | आधी ट्रक चालकाशी वाद, नंतर स्वीकारली लाच, पैसे खिशात टाकतानाचा ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल

(after o sheth marathi song small boy o sir marathi new song went viral on social media)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.