Airplane Accident: बापरे! विमानाने धावपट्टी सोडली आणि…व्हायरल!
अपघातानंतर विमानतळ काही काळासाठी प्रवासी आणि मालवाहू विमानांसाठी बंद करण्यात आले आहे. या विमानाचा फोटो सुद्धा व्हायरल झालाय.
आजकाल विमानातील बिघाड आणि त्यांचे अपघात अशा घटना जगभरातून समोर येत आहेत. अलीकडेच फ्रान्समधील एका विमानतळावर एक मालवाहू विमान धावपट्टीवरून घसरून बाजूच्या सरोवराच्या पाण्यापर्यंत पोहोचलं. सुदैवाने, विमान तलावात पूर्णपणे जाऊ शकलं नाही. विमान तिथेच अडकलं. सगळ्यात महत्त्वाचं या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
ही घटना फ्रान्सच्या मोंपेली शहरातील आहे. इंडिपेंडंटमधील वृत्तानुसार, विमानतळावर उतरताना एक विमान धावपट्टीतून बाहेर गेलं आणि जवळच्या तलावात अर्धं बुडालं. अपघातानंतर विमानतळ काही काळासाठी प्रवासी आणि मालवाहू विमानांसाठी बंद करण्यात आले आहे.
या विमानाचा फोटो सुद्धा व्हायरल झालाय. यात हे विमान धावपट्टी आणि तलावाच्या मध्ये पडलेलं दिसून येतंय. या अहवालानुसार, शनिवारी सकाळी पॅरिस चार्ल्स डी गॉल विमानतळावरून हे बोईंग 737 कार्गो निघाले होते, असे विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले.
मॉन्टपेलियर विमानतळावर लँडिंग दरम्यान, विमान धावपट्टीच्या बाहेर पलीकडे गेले आणि जवळच्या तलावात बुडाले. ही घटना प्रचंड धक्कादायक होती. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही.
विमानातील तिघांनाही वाचवण्यात यश आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे विमानाचं एक इंजिनही पाण्यात बुडालं आहे.