विमानांमध्ये बिघाड होऊन त्यांचे अपघात झाल्याचे व्हिडिओ जगभरातून खूप प्रसिद्ध होत असतात. नुकतंच असं काही दृश्य पाहायला मिळालं, ज्यामुळे लोकांची चांगलीच तारांबळ उडालीये. मिनी विमान अचानक झाडावर आदळल्याने हा सर्व प्रकार घडला. झाडावर आदळताच ते विमान तिथंच कोसळलं. विमान पडल्यावर ते अशा काय पद्धतीनं खाली पडलं की ते पार्किंग मध्येच जाऊन उभं राहिलं जणू काय त्याला तिथेच पार्क केलं होतं. इतर गाड्यांच्या शेजारी.
खरंतर हा व्हिडिओ अनेक युझर्सनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. एक मिनी विमान वेगाने खाली कोसळताना दिसतंय, आकाशातून ते हालत डुलत येतंय, आधीच त्याचा तोल गेल्याचे दिसतंय.
खाली येताच ते पार्किंग एरियातील एका मोठ्या झाडाला धडकतं आणि पार्क केलेल्या गाड्यांच्या शेजारीच जाऊन कोसळतं.
हे विमान क्रॅशचे उदाहरण नसले, तरी पडल्या पडल्यावर ज्या पद्धतीने ते उभे राहिले आहे, ते पाहण्यासारखे आहे.
सुदैवाने विमानात बसलेल्या कोणालाही फारशी इजा झाली नाही. एक गोष्ट नक्की आहे की ज्या झाडाला हे विमान धडकलं ते झाड मात्र तुटलंय. विमान कधी आणि कुठून आला याची माहिती मिळालेली नाही.
या व्हिडिओमध्ये दिसतंय की, विमान जसं त्या झाडावर आदळतंय त्या झाडाचा वरचा भाग तुटून पडतोय. विमानाचा वेग प्रचंड असतो.
रस्त्यालगतच्या पार्किंगमध्ये हे विमान आरामात उभं आल्याचेही दिसून येते. हा व्हिडिओ काहीसा जुना असल्याचं बोललं जात आहे, जो आता पुन्हा व्हायरल झाला आहे.