अरे बापरे! दारू इतकी स्वस्त असू शकते?
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये बहुतांश दारूच्या बाटल्यांची किंमत 100 रुपयांपेक्षा कमी आहे. अशा तऱ्हेने लोक या पोस्टवर अत्यंत आश्चर्यचकित होऊन प्रतिक्रिया देत आहेत.
काही लोकांना फक्त पिण्यासाठी निमित्त हवे असते. मग ते लग्न असो किंवा समारंभ. अशा लोकांना दारूशिवाय प्रत्येक पार्टी फिकी वाटते. पण अनेकदा दारूचे चढे भाव बघनाही लोक दारू विकत घेण्यास कचरत नाहीत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की बाहेर चढ्या किमतीत विकली जाणारी दारू नौदलाच्या अधिकाऱ्यांना अत्यंत स्वस्त दरात मिळते. नेव्ही मेसच्या अशाच एका व्हायरल बिलाने लोकांना हादरवून टाकलंय
ट्विटरवर @AnantNoFilter नावाच्या हँडलवरून अनंत नावाच्या युजरने नौदल अधिकाऱ्यांसाठी मेसमध्ये उपलब्ध असलेल्या दारूच्या बाटल्यांच्या किमतीची लोकांना ओळख करून दिली, सर्वजण स्तब्ध झाले.
असलेल्या या बाटल्यांची किंमत इतकी कमी असू शकते यावर लोकांना विश्वास बसेना. आता हे बजेट फ्रेंडली हार्ड ड्रिंक्स सोशल मीडियावर लोकांमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत. “माझं बेंगळुरू मन या किंमती समजून घेण्यास असमर्थ आहे.”असं या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय.
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये बहुतांश दारूच्या बाटल्यांची किंमत 100 रुपयांपेक्षा कमी आहे. अशा तऱ्हेने लोक या पोस्टवर अत्यंत आश्चर्यचकित होऊन प्रतिक्रिया देत आहेत.
एका यूजरने लिहिलं, “ओह भाई! कोल्ड ड्रिंक्सची किंमत म्हणजे अल्कोहोल.” तर आणखी एका युजरचं म्हणणं आहे की, “बेंगळुरूमध्ये किंगफिशरची किंमतही 500 रुपये आहे.” आणखी एक युजर म्हणतो, “तू का जळत आहेस भाऊ, सैन्यात ये.”
एकंदरीतच बाहेर एवढी कमी किंमत आणि नेव्ही मेसमध्ये कवडीमोल किमतीत विकली जाणारी दारू बघून बहुतांश युजर्स हैराण झाले आहेत.