अहो आश्चर्यम! भारतातलं बुटक्या लोकांचं गाव, इथे राहतात फक्त बुटकी लोकं
आज आम्ही तुम्हाला अशा गावाबद्दल सांगणार आहोत जिथे राहणारी प्रत्येक व्यक्ती बुटकी आहे. होय! या गावात फक्त आणि फक्त बुटकी माणसं राहतात.
आसाम: हे जग आश्चर्याने भरलेले आहे. हे वाक्य जितक्या सहज आपण बोलतो, तितकंच महत्त्वाचं हे वाक्य आहे. जगातील विविध देशांमध्ये अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत. ही आश्चर्ये जेव्हा आपल्यासमोर येतात तेव्हा आपण हैराण होतो. भारतात अनेक अशी आश्चर्ये आहेत ज्याबद्दल लोकांना फारशी माहिती नाही. आज आम्ही तुम्हाला अशा गावाबद्दल सांगणार आहोत जिथे राहणारी प्रत्येक व्यक्ती बुटकी आहे. होय! या गावात फक्त आणि फक्त बुटकी माणसं राहतात.
हे गाव आसाम राज्यात आहे. हे अमार गाव म्हणून ओळखले जाते. या गावातील लोक पाहुण्यांचे अगदी आपुलकीने स्वागत करतात. या गावात सुमारे 70 लोक राहतात. ही गावे भूतान सीमेच्या तीन-चार किमी अलीकडे आहेत.
या गावात कुणाचीही उंची साडेतीन फुटांपेक्षा जास्त नाही. अशी एकही व्यक्ती तुम्हाला इथे दिसणार नाही जिची उंची इथे साडे तीन फुटांपेक्षा जास्त असेल. अमार गावात कुणी स्वत:च्या मर्जीने राहायला आलंय, तर काही लोक असे आहेत ज्यांच्या कुटुंबांनीच त्यांना सोडून दिलंय.
बुटक्यांचे सरदार म्हटले जाणारे सरदार नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधील कलाकार पवित्रा राभा यांनी 2011 साली हे गाव बांधल्याचं सांगितलं जातं.
NSD नंतर त्यांना पवित्र रंगमंचचा प्रचार करायचा होता. त्यांना बुटक्या कलाकारांना सुद्धा संधी उपलब्ध करून द्यायची होती. त्यांनी ठरवले की ते छोट्या उंचीच्या लोकांना कलाकार बनवणार.
अनेकांनी राभा आणि त्यांच्या सहकाऱ्यांची खिल्ली उडवली पण राभाने हार मानली नाही. या गावातील लोक दिवसा शेती करतात आणि संध्याकाळी स्टेजवर त्यांच्या कलेच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करतात. हे गाव खूप मजेदार आहे. या गावाची चर्चा सगळीकडे आहे.