Video: तरुणीची ‘मगर’मिठी, त्यानंतर काय झालं पाहा, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ!

सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर कुणाच्याही अंगावर काटा येईल. व्हिडिओमध्ये एक महिला आपल्याहून मोठ्या मगरीला मिठी मारताना दिसत आहे.

Video: तरुणीची 'मगर'मिठी, त्यानंतर काय झालं पाहा, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ!
मगरीला मिठी मारणारी तरुणी
Follow us
| Updated on: Nov 16, 2021 | 12:46 PM

मगरीचा जबडा खूप शक्तिशाली असतो. कोणताही प्राणी किंवा माणूसही त्याच्या तावडीत पडू शकत नाही हेच कारण आहे की सर्वच प्राणी मगरीपासून लांबच राहणं पसंत करतात. पण सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर कुणाच्याही अंगावर काटा येईल. व्हिडिओमध्ये एक महिला आपल्याहून मोठ्या मगरीला मिठी मारताना दिसत आहे. हे दृश्यं पाहून कुणाच्याही हृदयाचे ठोके चुकतील. (Amazing Crocodile Video Viral Video a woman hug a crocodile left netizens amazed have you see it Animal Attack)

व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये एक महिला मगरीसोबत जमिनीवर पडलेली दिसत आहे. हे दृश्य खरोखरच थक्क करणारं आहे. खरंतर, मगरीला बघून कुणाचीही हवा टाईट होते, तिथं ही मुलगी आरामात थंडगार होऊन मगरीला मिठी मारताना दिसते. मुलीकडे पाहून असे म्हणता येईल की तिला या मगरीची अजिबात भीती वाटत नाही. चला तर मग आधी हा व्हिडिओ पाहूया.

हा आश्चर्याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर ब्यूटिफुल अर्थ नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मी डार्थ गेटरला मिठी मारली. तसे, तुम्हाला माहिती आहे का की, कॅलिफोर्नियामधील डार्थ हा अतिशय आक्रमक प्रजातीचा गेटर आहे. याला पाळीव प्राणी म्हणून ठेवणं बेकायदेशीर आहे. लोक हा व्हिडिओ खूप पसंत करत आहेत. एका दिवसापूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओला 13 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक सतत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरवर कमेंट करताना लिहिले, तुम्हीही जे पाहत असाल ते मी पाहत आहे का? गॅटरने मुलीवर सूसू केली आहे का?

त्याच वेळी, काही वापरकर्ते कमेंट करत आहेत की, हा पाळीव प्राणी आहे की नाही? कारण तो आक्रमक असेल तर माणसांशी असं वागणार नाही. त्याचवेळी आणखी एका यूजरने कमेंट करताना लिहिले आहे की, अशा प्राण्यांपासून दूर राहा, नाहीतर एखाद्या दिवशी काहीतरी चूक होऊ शकते.

हेही पाहा:

इजिप्तमध्ये विंचवांनी नांगी आपटली, आतापर्यंत 500 जणांना दंश, बाहेर न पडण्याचं सरकारचं आवाहन

Video: दूध अचानक गुलाबी कसं झालं? घाबरलेल्या आईचा व्हिडीओ शेअर करत सवाल, डॉक्टरांनी सांगितलं हे कारण!

 

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.