Video: ‘डुब जा मेरे प्यार में’ गाण्यावर बेली डान्स, इन्स्टाग्रामवर आग लावणारा भन्नाट व्हिडीओ

व्हिडिओमध्ये, ओजस्वीने पांढर्‍या क्रॉप-टॉपसह एक सुंदर फ्लोरल स्कर्ट घातलेला दिसत आहे. गाण्याच्या मधुर बीट्सवर तिच्या चालींनी इंस्टाग्रामवर आग लावली आहे.

Video: 'डुब जा मेरे प्यार में' गाण्यावर बेली डान्स, इन्स्टाग्रामवर आग लावणारा भन्नाट व्हिडीओ
बेली डान्सचा व्हिडीओ
Follow us
| Updated on: Nov 13, 2021 | 3:22 PM

इंटरनेटवर डान्सचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. असे काही आहेत ज्यांना पुन्हा पुन्हा पहावेसे वाटते. बेली डान्स प्रत्येक व्यक्तीला आवडतो, परंतु तो करणं तितकेच कठीण आहे. बेली डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर फारसे पाहिले जात नाहीत, पण जेव्हा एखादा व्हिडिओ समोर येतो, तेव्हा लोक प्रत्येक प्लॅटफॉर्मवर शेअर करायला विसरत नाहीत. सध्या एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एका महिलेचा बेली डान्स लोकांना खूप भुरळ घालत आहे. प्रत्येकाला तो व्हिडिओ इतका आवडला आहे की तो पाहिल्याशिवाय आणि पुन्हा पुन्हा शेअर केल्याशिवाय राहता येत नाही. (Amazing Dance Video of Woman performs belly dance on Doob Jaa Mere Pyaar Main in viral video Indian Classical Dance)

इंटरनेट सुंदर डान्स व्हिडिओंनी भरले आहे आणि अशाच एका महिलेच्या कामगिरीने नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, एक महिला ‘डूब जा मेरे प्यार में’ गाण्यावर बेली डान्स करताना दिसत आहे आणि तिचे एक्सप्रेशन तसेच तिच्या चालींनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. हा व्हिडिओ ओजस्वी वर्मा नावाच्या महिलेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे आणि आता तो प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिसत आहे.

पाहा व्हायरल व्हिडिओ-

व्हिडिओमध्ये, ओजस्वीने पांढर्‍या क्रॉप-टॉपसह एक सुंदर फ्लोरल स्कर्ट घातलेला दिसत आहे. गाण्याच्या मधुर बीट्सवर तिच्या चालींनी इंस्टाग्रामवर आग लावली आहे. तिचं लखलखीत नृत्य अतिशय सुंदर आहे. व्हिडिओमध्ये ती एकही बीटही चुकवत नाहीये. हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे, तसेच हजारो लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. व्हिडिओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मी हा डान्स व्हिडिओ माझ्या क्रश डूब जा मेरे प्यार मेंसाठी पाठवत आहे.’

सोशल मीडिया युजर्सनीही व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया शेअर करून प्रेमाचा वर्षाव केला आहे. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले, ‘हा व्हिडिओ खरोखरच सुंदर आहे’ दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘Wow fantastic, osm, mind blowing, dancing mam’ तिसऱ्या यूजरने लिहिले, ‘तू अप्रतिम डान्स करतेस आणि तू खूप सुंदर आहेस’. युजरने त्याला विनंती करत लिहिले, ‘तुम्ही कृपया तुम्ही रोजच्या रोज व्हिडिओ पोस्ट करा, आम्हाला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात’ या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी हार्ट इमोजी, फायर इमोजी आणि ब्लश असे लिहिले आहे. इमोजी शेअर करून प्रेमाचा वर्षाव होतो.

हेही वाचा:

Video: भावाची चप्पल तुटली, त्यानंतर त्याने असा जुगाड केला, की आता पाय तुटेल पण चप्पल नाही!

Video: बेडकासोबतचा चिमुरडीचा क्युट व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, प्राण्यासोबतचं हे नातं खरंच गोड आहे

 

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.