डॉक्टर असावा तर असा! इंजेक्शन द्यायची पद्धत तर बघा…
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनात नक्कीच येईल,'डॉक्टर असावा तर असा'.
जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना इंजेक्शनची खूप भीती वाटते. लहान मुलं अशावेळी थोडी घाबरलेली असतात, पण त्यात मोठ्यांचाही समावेश असतो. खरं तर, लोकांच्या मनात एक फोबिया आहे की इंजेक्शन्स मिळाल्यानंतर खूप वेदना होतात. बरं, इंजेक्शन घेताना लहान मुलं ओरडतात आणि खूप रडतात साहजिकच आई-वडीलही अस्वस्थ होतात. पण हल्ली सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात डॉक्टरांनी एका लहान मुलाला अशा पद्धतीनं इंजेक्शन दिलं की तो अजिबात रडला नाही.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनात नक्कीच येईल,’डॉक्टर असावा तर असा’. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हे मूल बेडवर पडले आहे आणि एक डॉक्टर त्याची तपासणी करत आहेत.
त्याचबरोबर तो मुलाला खूप हसवण्याचाही प्रयत्न करतो, ज्यामुळे मुलाला खूप आनंद होतो आणि सायकल चालवल्याप्रमाणे जोरजोरात पाय फिरवू लागतो.
यानंतर डॉक्टर ‘खेळता-खेळता’ मुलाच्या गुडघ्यावर इंजेक्शन लावतात. आता इंजेक्शन दिल्यानंतर बाळ रडणारच एवढ्यात डॉक्टर त्याला एक खेळणं दाखवतात आणि त्याचं लक्ष विचलित करतात, जेणेकरून मूल त्यात हरवून जातं आणि इंजेक्शनच्या दुखण्यावर रडायला विसरतं.
सय्यद मुजाहिद हुसेन असे या डॉक्टरचे नाव सांगितले जात आहे. ते बेंगळुरूच्या गुडविल चिल्ड्रन्स क्लिनिकमध्ये सल्लागार बालरोगतज्ज्ञ आहेत.
View this post on Instagram
हा उत्तम व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर dr_hifive नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 21 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.
10 लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईक देखील केला आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.