Video: सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं कुत्र्याचं भूत, ऑस्ट्रेलियातील व्यक्तीच्या दावात किती सत्य, तुम्हीच पाहा!

मेलबर्नच्या जॅक डीमार्को नावाच्या व्यक्तीने दावा केला आहे की, त्याने आपल्या घराच्या बागेच्या मागे आपल्या पाळीव कुत्र्यासोबत एक 'कुत्र्याचं भूत' खेळताना पाहिलं आहे.

Video: सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं कुत्र्याचं भूत, ऑस्ट्रेलियातील व्यक्तीच्या दावात किती सत्य, तुम्हीच पाहा!
CCTV फूटेजमध्ये कुत्र्याचं भूत दिसल्याचा दावा
Follow us
| Updated on: Nov 23, 2021 | 4:08 PM

काहीवेळा अशी काही दृश्यं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होतात, जी पाहून डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण जातं. कधी कधी कॅमेरे आपल्याला सत्य दाखवतात ज्याकडे आपण इच्छा असूनही दुर्लक्ष करू शकत नाही. अशा अनेक व्हिडीओ क्लिप तुम्हाला इंटरनेटवर पाहायला मिळतील, ज्यावरून हे सिद्ध होते की, काही विस्मयकारी गोष्टीही आपल्या आजूबाजूला असतात, ज्याची उघड्या डोळ्याने आपल्याला जाणीव होत नाही. असाच एक सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक ‘पारदर्शक कुत्रा’ कैद झाल्याचा दावा केला जात आहे. ही धक्कादायक घटना ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमधील आहे.

मेलबर्नच्या जॅक डीमार्को नावाच्या व्यक्तीने दावा केला आहे की, त्याने आपल्या घराच्या बागेच्या मागे आपल्या पाळीव कुत्र्यासोबत एक ‘कुत्र्याचं भूत’ खेळताना पाहिलं आहे. जॅक सांगतात की, हा कुत्रा सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला आहे, ज्यामध्ये तो पारदर्शक दिसत आहे. हे फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर जॅक डीमार्को खूप घाबरले आहेत.

व्हायरल झालेल्या फुटेजमध्ये घराच्या मागील अंगणात एक कुत्रा पिल्लाच्या मागे धावताना दिसत आहे. व्हिडिओ पाहून दोघेही एकमेकांसोबत खेळत असल्याचं दिसत आहे. पण ही व्हिडीओ क्लिप नीट पाहिल्यावर तुम्हाला मोठा कुत्रा पारदर्शक दिसेल. हे पाहून जॅक डीमार्को खूप घाबरले.

चला तर मग हा व्हिडिओ पाहूया.

जॅक डीमार्कोने सांगितले की, त्याच्या घरामागील कुंपण खूप उंच आहे. अशा परिस्थितीत बाहेरील कोणत्याही प्राण्याला आतमध्ये प्रवेश करणे कठीण होते. पण तरीही व्हिडिओ क्लिपमध्ये दोन कुत्रे दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे जॅक यांनी दावा केला आहे की, सीसीटीव्हीमध्ये पाळीव कुत्र्यासोबत आणखी एक कुत्रा दिसल्यानंतर ते धावतच घरामागील अंगणात पोहोचले, मात्र तिथे त्यांना दुसरा कुत्रा दिसलाच नाही. या घटनेनंतर जॅक खूप घाबरला आहे. त्यांचा असा विश्वास आहे की ते कुत्र्याचं भूत होतं. मात्र, सोशल मीडिया युजर्सचे मत वेगळे आहे. नेटकरी जेकचा मुद्दा नाकारत आहेत. लोक म्हणतात की, तो पारदर्शक कुत्रा नव्हता तर पांढरा कुत्रा होता. त्याचे चमकणारे डोळे कॅमेऱ्यात पाहायला मिळतात. कदाचित कुंपणाची उंची जास्त नसेल आणि तो कुत्रा तिथे घुसला असावा, असे लोकांचे म्हणणे आहे.

हेही पाहा:

Video: तिरुपतीच्या पुरात फसलेल्या पुजाऱ्याला ट्रॅफिक पोलिसाने वाचवलं, शूरवीर पोलिसाचं नेटकऱ्यांकडून कौतुक

ज्युसर खाली ग्लास ठेवायला विसरला ‘खली’, 2 संत्रीचा ज्यूस काढल्यानंतरही ग्लास खालीच, पाहा भन्नाट Video!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.