Amazon App चा नवा लोगो आठवड्याभरात हटवला, हिटलरच्या मिशीसोबत तुलनेनंतर बदल

अ‍ॅमेझॉन अ‍ॅपच्या नव्या लोगोवर जगभरातील युजर्सकडून टीकेची झोड उठली होती. (Amazon app logo Hitler Moustache)

Amazon App चा नवा लोगो आठवड्याभरात हटवला, हिटलरच्या मिशीसोबत तुलनेनंतर बदल
अॅमेझॉन अॅपचा आधीचा लोगो आणि हिटलरची प्रतिमा
Follow us
| Updated on: Mar 03, 2021 | 8:03 AM

मुंबई : बलाढ्य ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनने (Amazon) आपल्या अ‍ॅपचा लोगो बदलला. अ‍ॅमेझॉन अ‍ॅपच्या लोगोची हिटलरच्या चेहऱ्याशी तुलना झाल्यानंतर तातडीने पावलं उचलण्यात आली. अ‍ॅमेझॉन अ‍ॅपच्या नव्या लोगोवर जगभरातील युजर्सकडून टीकेची झोड उठली होती. (Amazon changes app logo after comparison with Adolf Hitler Moustache)

जुन्या लोगोमध्ये काय होतं?

अ‍ॅमेझॉनने नुकताच त्यांच्या फोन अ‍ॅपचा सिंबॉल म्हणजेच लोगो बदलला होता. नव्या लोगोमध्ये ब्राऊन रंगाचा एक बॉक्स होता. पॅकिंग बॉक्स सदृश्य असलेल्या या चौकोनाच्या वरच्या बाजूला निळ्या रंगाची खूण होती. ही निळी खूण म्हणजे सेलोटेपचं प्रतिकात्मक चिन्हं होतं. तर मध्यभागी अ‍ॅमेझॉनचा सिग्नेचर अ‍ॅरो आहे.

नवीन लोगो काय?

अ‍ॅमेझॉन अ‍ॅपचा लोगो बदलून काही आठवडे होत नाहीत, तोच जगभरातील ग्राहकांनी टीकेची झोड उठवली. ब्ल्यू स्ट्रीप म्हणजे जर्मनीतील हुकूमशाह अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या ‘आयकॉनिक’ मिशीसारखी वाटत असल्याची तक्रार करण्यात आली होती. या वादग्रस्त निळ्या पट्टीलं रुपडं बदलून नव्या स्वरुपात लोगो सादर करण्यात आला आहे.

Myntra च्या लोगोवरुनही वाद

ई कॉमर्स कंपनी मिंत्राने (Myntra) काही महिन्यांपूर्वीच आपला लोगो बदलण्याचा निर्णय घेतला. मुंबईतील एका महिलेच्या तक्रारीनंतर मिंत्राने हा निर्णय घेतला. मिंत्राच्या लोगोमुळे महिलांच्या भावना दुखावत असून, त्यांचा अपमान करणारा आहे, असा आरोप एका महिलेने केला होता. या महिलेने थेट सायबर पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता मिंत्राने एक पाऊल मागे घेत, आपला लोगो बदलण्याचा निर्णय घेतला.

मिंत्राच्या लोगोत नेमकं आक्षेपार्ह काय?

मिंत्राचा लोगो महिलांचा अपमान करणारा आहे. कारण त्यात एक महिला प्रसुती अवस्थेत बसली आहे, असं सूचित करण्यात येत होतं, असा दावा तक्रारदार महिलेने केला होता. काही काळापूर्वी तक्रारकर्त्या नाज पटेल ह्या एका कार्यक्रमात गेल्या होत्या. तिथं मिंत्राची जाहिरात दाखवली गेली. त्यावेळी काही पुरुष मंडळी त्यावर कुजबूज करायला लागली. तक्रारकर्त्या नाज पटेलांनी त्याबद्दल विचारणा केली पण पुरुष मंडळी त्यावर त्याक्षणी काही बोलली नाही. नंतर त्यांनी खासगीत एक दोन पुरुषांना विचारलं त्यावेळेस त्या लोगोत महिला स्वत:चे दोन्ही पाय फाकवून बसलीय असं दाखवण्यात आल्याचं काहींचं म्हणणं होतं, नंतर निरीक्षणाअंती ते पटल्याचं त्या म्हणाल्या होत्या.

संबंधित बातम्या :

Myntra Logo Change : महिलेच्या तक्रारीनंतर कंपनीनं लोगो बदलला, नेटीझन्समध्येही वाद

(Amazon changes app logo after comparison with Adolf Hitler Moustache)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.