अमेरिकन महिलेने पहिल्यांदा खाल्ली बिर्याणी, काय म्हणाली बघाच!
जेव्हा एका अमेरिकन महिलेने पहिल्यांदा 'चिकन टिक्का बिर्याणी' आणि 'समोसा चाट' ट्राय केली तेव्हा तिची प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे. हा व्हिडिओ 13 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.
भारतीय खाद्यपदार्थ आणि चवीला तोड नाही. परदेशी लोकही आपल्या स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेताना त्याचे कौतुक करताना थकत नाहीत. आता पाहा व्हायरल होणारा हा व्हिडिओ. जेव्हा एका अमेरिकन महिलेने पहिल्यांदा ‘चिकन टिक्का बिर्याणी’ आणि ‘समोसा चाट’ ट्राय केली तेव्हा तिची प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे. हा व्हिडिओ 13 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.
सिंडी नॉयरच्या इन्स्टा प्रोफाईलवरून ती मोटिव्हेशनल स्पीकर असल्याचे दिसून येते. नुकतेच तिने पहिल्यांदा भारतीय पदार्थ ट्राय केले तेव्हा त्याची चव तिला इतकी आवडली की तिचे कौतुक करताना थकली नाही. तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो व्हायरल झाला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला महिला तिला भारतीय पदार्थ किती आवडतात हे सांगते. “मी समोसा चाट आणि चिकन टिक्का बिर्याणी खाल्ली. यावेळी महिला ज्या प्रकारे भारतीय खाद्यपदार्थांचे कौतुक करते, ते पाहण्यासारखे आहे.
सिंडी नोयर (Cindy Noir) नावाच्या इन्स्टा अकाऊंटवरून व्हिडिओ शेअर करून भारतीय मसाल्यांचं यात भरभरून कौतुक करण्यात आलं आहे. यासोबतच त्याचं खूप कौतुक करण्यात आलं आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 1.71 लाखांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे, तर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. कमेंट सेक्शनमध्ये भारतीयांनीभरभरून प्रतिसाद दिलाय.
View this post on Instagram
एका युजरने लिहिले की, ‘मी भारतीय नाही, पण इथलं जेवण घरासारखं वाटतं. तर आणखी एका युजरने लिहिलं आहे की, समोसा चाट ही एक पौराणिक डिश आहे. आणखी एका युजरने लिहिलं आहे की, “तुम्ही चुकीचा उच्चार केलात, पण भारतीय खाद्यपदार्थांवर असलेल्या प्रेमापोटी आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो.”