सोशल मीडियावर (Social Media) नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ शेअर होत असतात. फेसबुक असो, इन्स्टाग्राम असो किंवा ट्विटर, अशा सर्व प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्व प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील. मजेशीर व्हिडिओंपासून ते इमोशनल आणि अगदी चकित करणारे व्हिडीओजही अनेकदा इथे व्हायरल होतात. असाच एक मजेशीर व्हिडिओ (Funny Video) सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल (News Anchor Viral Video) होत आहे, तो पाहून आणि संपूर्ण प्रकरण जाणून घेतल्यानंतर तुम्हाला हसू आवरणार नाही. हा व्हिडिओ एका अँकरशी संबंधित आहे. या अँकर सोबत लाइव्ह न्यूजमध्ये एक अशी घटना घडली की जी घटना स्वतः त्या अँकरने सोशल मीडियावर शेअर केलीये.
अँकर्स किती गंभीर असतात आणि कोणतीही बातमी लोकांपर्यंत पोहचवताना ते किती गंभीरपणे ती पोहचवतात हे आपण सगळेच पाहतो.
अशाच एक गांभीर्यानं एक महिला अँकर ही बातमी वाचून प्रेक्षकांना पाकिस्तानातील भीषण पुराची माहिती सांगत होती, यादरम्यान अचानक एक माशी तोंडात गेली, जी तिनेही गिळली.
Sharing because we all need a laugh these days. Turns out it’s not just @fordnation, I swallowed a fly on air today.
(Very much a first world problem given the story I’m introducing). pic.twitter.com/Qx5YyAeQed
— Farah Nasser (@FarahNasser) August 29, 2022
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, महिला अँकर कशाप्रकारे पाकिस्तानात आलेल्या पुराची माहिती लोकांना गंभीरपणे देत आहे. हा व्हिडिओ पाहताना तिच्या तोंडात माशी कधी शिरते हे कळत नाही, पण तिच्या हावभावावरून एक अंदाज येतो असं तिने स्वतः सुद्धा कॅप्शनमध्ये म्हटलंय.
फराह नासेर असं या महिला अँकरचं नाव असून ती ग्लोबल नॅशनल विकेंडची अँकर आहे. तिने स्वतः आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे आणि सांगितले आहे की, मी हवेतली माशी गिळलीये.
16 सेकंदाचा हा व्हिडिओ 1 लाखापेक्षा जास्त वेळा पाहिला गेलाय. शेकडो लोकांनी हा व्हिडिओ लाईक करत विविध प्रतिक्रियाही दिल्या आहेत.