दिवसभर कष्ट करून घाम गाळून कमवलेले पैसे, चिल्लर मोजताना दिसली वयस्कर व्यक्ती! व्हिडीओ व्हायरल
ते जमा झालेले पैसे अगदी मन लावून मोजतायत. हा व्हिडीओ खूप भावुक करणारा आहे. बरंच काही शिकवणारा पण आहे हा व्हिडीओ.
वयस्कर लोकांचे व्हिडीओज मनाला नेहमी भावतात नाही का? हसताना असो, रडताना असो, नाचताना सुद्धा…कमाल व्हिडीओ असतात हे! दिवसभर काम करून थकून भागून एक आजोबा पैसे मोजतायत. सुमुद्रकिनारी एका छोट्याशा टपरीमध्ये बसून ते जमा झालेले पैसे अगदी मन लावून मोजतायत. हा व्हिडीओ खूप भावुक करणारा आहे. बरंच काही शिकवणारा पण आहे हा व्हिडीओ.
व्हिडीओ नीट बघा…हे आजोबा एका टपरीवर चष्मा लाऊन बसलेत. दिवसभराची कमाई ते तिथे बसून मोजतायत. कदाचित मोजणी चुकू नये म्हणून त्यांनी चष्मा लावलेला असावा. ही टपरी नदीकाठी किंवा समुद्राकाठी असावी असं दिसून येतंय.
आधी हे आजोबा नोटा मोजतायत, त्यानंतर टेबलवर ठेवलेल्या चिल्लरकडे नीट बघतायत. “किती आहेत हे चिल्लर” असं म्हणत असावेत ते मनात! चिल्लर मोजून घेतायत. कदाचित त्यांना काहीतरी विकत घ्यायचं असावं म्हणून ते त्या दृष्टीने पैसे मोजतायत.
“जिंदगी गुलजार है” नावाचं ट्विटरवर एक फेमस अकाऊंट आहे. या अकाऊंट वरून हा व्हिडीओ “दिनभर की कमाई” असं कॅप्शन टाकून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहिल्याशिवाय राहवत नाही.
“दिनभर की कमाई”
दिनभर की कमाई ?❤️ pic.twitter.com/pHEqKvflLN
— ज़िन्दगी गुलज़ार है ! (@Gulzar_sahab) September 20, 2022
ट्विटरवर अपलोड केल्यानंतर हा व्हिडिओ 3 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेलाय. या व्हिडिओमुळे लोकांना सर्व प्रकारच्या भावना जाणवत होत्या, हे वेगळं सांगायला नको.
व्हिडिओचं लोकेशन अज्ञात आहे, पण तो ज्या झोपडीत बसलाय तो नदीच्या काठावर असल्याचं स्पष्ट दिसतंय. व्हिडिओच्या शेवटच्या सेकंदात वृद्ध व्यक्तीकडे पाहिलं तर तुम्हालाही कळेल की, त्याचे पैसे थोडे कमी दिसत होते, त्याने आपल्या खिशाकडे पाहिलंय.